वाशिम : अरुणाचल प्रदेशात कमेंग व्हॅली येथे भारत-चीनच्या सीमेवर सहकाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात शहीद झालेल्या सोनखास (ता.जि. वाशिम) अमोल गोरे यांचे नाव वाशिम येथील पाटणी चाैकाला देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हयातील विविध राजकीय पक्षासह, सामाजिक संघटना एकवटली असून २१ एप्रिल राेजी शहरातून रॅली काढून जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्यासह नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेकडे निवदेन देतेवेळी विविध राजकीय पक्षाचे, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित हाेते.
पाटणी चाैकाला शहिद अमाेल गाेरे यांचे नाव देण्यासाठी वाशिमकर एकवटले!
By नंदकिशोर नारे | Updated: April 21, 2023 14:16 IST