शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद सभापती पदासाठी रस्सीखेच!

By admin | Updated: July 6, 2016 03:10 IST

सत्ताधारी व मित्रपक्षाच्या सदस्यांची मोर्चेबांधणी : विरोधकांचे ‘वेट अँण्ड वॉच’, ८ जुलै रोजी निवडणूक.

वाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर, आता सत्ताधारी व मित्रपक्षांच्या सदस्यांमध्येच विषय समितीच्या सभापती पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. ८ जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीत भाजपा-सेना व विरोधकांनी सध्यातरी ह्यवेट अँण्ड वॉचह्णची भूमिका घेतल्याचे दिसून येते.मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत १७ जागा घेऊन काँग्रेस हा पक्ष जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने २९ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. सत्तापालट करण्यासाठी शिवसेना, भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष, मनसे सदस्यांबरोबरच काँग्रेस-राकाँचा नाराज गट फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जिल्हा परिषदेवर भाजपा-सेनेचा झेंडा फडकविण्याच्या इराद्याने राजकीय आखाड्यात उतरलेल्या विरोधकांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी इकडे काँग्रेस-राकाँच्या स्थानिक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर्गतचे वाद बाजूला सारून बैठकांचा सपाटा लावला. माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार प्रकाश डहाके हे चारही दिग्गज एका ठिकाणी बसल्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक काँग्रेस-राकाँने अपक्ष व भारिपच्या मदतीने एकहाती जिंकली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या हर्षदा दिलीप देशमुख, तर उपाध्यक्षपदी राकाँचे चंद्रकांत ठाकरे मताधिक्क्याने विजयी झाले. आता विषय समिती सभापती पदासाठी ८ जुलै रोजी निवडणूक होत आहे. सभापतीपदी विराजमान होण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राकाँ व अपक्ष सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत करारी हार पत्करावी लागल्याने विरोधक सध्यातरी ह्यवेट अँण्ड वॉचह्णच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते.