शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वाशिममधील ‘वाइन शॉपी’ थाटली ५०० मीटरच्या आत

By admin | Updated: July 5, 2017 01:14 IST

शुल्क विभागाच्या मोजणीत निष्पन्न: जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची प्रतीक्षा!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक जयभवानी नगरच्या हद्दीत नव्याने सुरू झालेल्या वाइन शॉपचे अंतर पाटणी चौकातून प्रत्यक्ष वाइन शॉपपर्यंत मोजले असता ५०० मीटरच्या आत म्हणजेच फक्त ४९८ मीटर असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मोजणीत निष्पन्न झाले असून, आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून याप्रकरणी कोणती कारवाई केली जाते, त्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. राज्य उत्पादन शुल्काच्यावतीने शहरातील भवानी नगर परिसरात नवीन वाइन शॉप सुरू करण्याचा परवाना देण्यात आला. सदर वाइन शॉपमुळे परिसरातील रहिवासी व नागरिकांसह रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना व महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. चक्क रस्त्यावर रात्रंदिवस दारुड्यांचे टोळके जमा होऊन महिलांना टार्गेट करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सदरचे वाइन शॉप त्वरित बंद करण्यात यावे, यासाठी परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून, वाइन शॉप हटविण्याकरिता आंदोलनासाठी सरसावले आहेत. राज्य उत्पादर शुल्क विभागाचे निरीक्षक नारायण सुर्वे यांनी २७ जून रोजी सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक नारायण सुर्वे यांनी मंगळवार, ४ जुलै रोजी दुपारी पाटणी चौक येथील राज्य महामार्ग ते संबंधित वाइन शॉपपर्यंतचे अंतर नागरिकांच्या उपस्थितीत सायकल यंत्राच्या साहाय्याने मोजण्यात आले होते. सदर सायकल यंत्राने ४९८ मीटर एवढे अंतर असल्याची नोंद केली असून, प्रत्यक्षात ५०० मीटरच्या नियमाला तडा दिला आहे. याबाबत शासकीय विश्रामगृह येथे आमदार लखन मलिक यांचे स्वीय सहायक योगेश देशपांडे, नगरपालिकेचे नियोजन सभापती अमित मानकर, श्री एजन्सीचे संचालक किरण सोमाणी, नीलेश जयस्वाल, राजू दिग्रसकर, बबलू शर्मा, प्रकाश पेंढारकर, पवन पेंढारकर, पिंटू रोकडे, विजय रंगभाळ, आदींनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश कावळे यांची भेट घेतली. त्यांना सत्य परिस्थितीची माहिती दिली. राज्य महामार्गाच्या कडेपासून ५०० मीटरच्या वर अंतर असलेल्या जागेत वाइन शॉप सुरू करण्याचा शासकीय नियम असताना ४९८ मीटरच्या जागेला ५०१ मीटरचे अंतर दर्शवून संबंधित वाइन शॉपला परवाना देण्यात आल्याची बाब पोलीस अधीक्षक कावळे याच्या निदर्शनात आणून दिली. नियमानुसार महामार्गाच्या कडेपासून अंतर मोजणीचे आदेश असताना सदरची मोजणी महामार्गाच्या मध्यभागातून मोजणी केली असतानाही सदर वाइन शॉप फक्त ४९८ मीटरपर्यंत अंतरावर असल्याचे सिद्ध झाले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या बाबीकडे लक्ष घालून संबंधित वाइन शॉपी त्वरित व कायमची बंद करावी व महिला भगिनींसह नागरिकांना तसेच रहदारी करणाऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा शहरवासी बाळगून आहेत. संबंधित वाइन शॉपचे अंतर महामार्गापासून ५०० मीटरपेक्षा कमी म्हणजेच ४९८ मीटर एवढेच अंतर असल्याची नोंद आपल्या विभागाने केलेल्या सायकल यंत्राणे केली आहे. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर वाइन शॉप बंद करण्याबाबत आपण प्रयत्न करू. -राजेश कावळे,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, अकोला.