शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Washim: ‘डीपीसी’ सभेची प्रतीक्षा कायम; प्रस्तावित कामांचा उद्या आढावा

By संतोष वानखडे | Updated: October 18, 2023 17:54 IST

Washim: चालू आर्थिक वर्षातील सहा महिने संपूनही जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा होत नसल्याने निर्वाचित सदस्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

- संतोष वानखडेवाशिम : चालू आर्थिक वर्षातील सहा महिने संपूनही जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा होत नसल्याने निर्वाचित सदस्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) यांसह अन्य विषयांचा आढावा घेण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक घेतली जाणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या आराखड्याला अंतिम दिशा देण्याचे काम केले जाते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण),अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेतून करावयाच्या कामांचे नियोजन, यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या विविध कामांना मंजुरी देणे यांसह जिल्हा विकासाच्या आराखड्यावर मंथन व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीची सभा तीन महिन्यांतून एकदा होणे अपेक्षित आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील सहा महिने संपूनही जिल्हा नियोजन समितीची सभा अद्याप झाली नाही. जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे १७ सदस्य हे डिसेंबर २०२२ मध्ये निवडून आले होते. तेव्हापासून डीपीसीची एकही ऑफलाईन सभा नसल्याने सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत लवकरात लवकर डीपीसीची सभा घ्यावी, अशी मागणी लावून धरली. काही सदस्यांनी तर राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली. यामुळे जिल्हा नियोजन समितीची सभा लवकरच होईल, असा आशावाद निर्माण झाला होता; परंतु आता जिल्हा नियोजन समितीच्या सभेऐवजी पालकमंत्री संजय राठोड हे विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी २० ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक घेणार आहेत. नियोजन समितीच्या सभेला बगल दिली जात असल्याचा आरोप करीत निर्वाचित सदस्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.कोणत्या विषयांचा आढावा?डीपीसीच्या सभेत पालकमंत्र्यांकडून विविध विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण),अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना सन २०२३-२४ या वर्षात यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या कामांचा तसेच आय-पास प्रणालीवर प्रस्तावित केलेली कामे व मान्यता मिळालेली कामे आदींचा यामध्ये समावेश आहे.

जिल्हास्तरीय समिती गठीततीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीनुसार आराखड्यामध्ये झालेल्या बदलासाठी जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात बैठक होणार आहे.

टॅग्स :washimवाशिम