शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: नऊ खासगी रुग्णालयांमध्ये मिळेल अडीचशे रुपयांत लस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 11:36 IST

CornaVaccine : सात शासकीय रुग्णालयांत ही लस मोफत देण्यात येणार असून, ९ खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये देऊन ही लस घेता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आरोग्य विभागाने १ मार्चपासून खासगी आणि शासकीय रुग्णालयात सर्वसामान्यांतील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षे वयावरील गंभीर आजारग्रस्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी नोंदणी केली जाणार आहे.  जिल्ह्यात सात शासकीय रुग्णालयांत ही लस मोफत देण्यात येणार असून, ९ खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये देऊन ही लस घेता येणार आहे.आरोग्य विभागाने १ मार्चपासून सर्वसामान्यांतील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसह ४५ वर्षे वयांवरील गंभीर आजारग्रस्त रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सर्व नियोजन केले आहे. शासनाच्या सूचनेनुसार या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार असून, यात खासगी दवाखान्यांची ई-पॅनलद्वारे निवड केली आहे. जिल्ह्यातील ९ खासगी आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे. लोकांना नोंदणी केल्यानंतर लस टोचून घेण्याची तारीख देण्यात येणार असून, त्या तारखेला लसीसाठी बोलावले जाईल.

मोबाइल अ‍ॅपवरही नोंदणीआरोग्य विभागाकडून सर्वसामान्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेत पहिल्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजारग्रस्त लोकांना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन २ अ‍ॅपद्वारे अ‍ॅण्डॉइड मोबाइलवर लस घेऊन इच्छिणाऱ्यांना नोंदणी करता येणार असून, संबंधित लसीकरण केंद्रावरही प्रत्यक्ष नोंदणीची व्यवस्था करण्याची तयारी सुुरू आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सरकारी रुग्णालये१) जिल्हा सामान्य रुग्णालय  २) कारंजा उपजिल्हा रुग्णालय३) मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालय४) रिसोड ग्रामीण रुग्णालय५) मालेगाव ग्रामीण रुग्णालय६) मानोरा ग्रामीण रुग्णालय७) रेनॉल्ड्स हॉस्पिटल, वाशिम 

खाजगी रुग्णालये१) डॉ. व्होरा हॉस्पिटल, वाशिम२) मॉ गंगा मेमोरियल हॉस्पिटल, वाशिम३) बालाजी बालरुग्णालय, वाशिम४) बाजड हॉस्पिटल, वाशिम५) वाशिम क्रिटिकल केअर सेंटर,  वाशिम६) लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल७) बिबेकर हॉस्पिटल, वाशिम८) देवळे हॉस्पिटल, वाशिम९) कानडे हॉस्पिटल, वाशिम

ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारग्रस्तांनाच लस शासनाकडून पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचारी आणि खासगी आरोग्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर आता ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ वर्षे वयावरील गंभीर आजारग्रस्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम