शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात चार पिल्लांसह बिबट दिसल्याची चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:21 IST

मानोरा (वाशिम ) : सोमेश्वरनगरातील शेतशिवारात कापूस वेचणा-या महिलांना २७ डिसेंबर रोजी चार बछड्यांसह मादी बिबट दिसल्याची चर्चा असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर वनविभागाच्या अधिका-यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना कोणातेच श्वापद परिसरात आढळून आले नाही.

ठळक मुद्देघाबरलेल्या महिला शेतातून घरी परतल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम ): तालुक्यातील सोमेश्वरनगर शेतशिवारातील धनसिंग चव्हाण यांच्या शेतात २७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास कापूस वेचताना महिलांना चार पिल्लांसह मादी बिबट दिसले.  त्यामुळे धास्तावलेल्या महिलांनी शेतातून घरचा रस्ता धरला. दरम्यान, ही चर्चा परिसरात पसरल्याने चांगलीच खळबळ उडाली. वनविभागाच्या अधिका-यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना कोणातेच श्वापद परिसरात आढळून आले नाही.

जंगलास लागूनच असलेल्या धनसिंग अमरसिंग चव्हाण यांच्या शेतात कापूस वेचण्याकरिता सात-आठ महिला गेल्या होत्या. यादरम्यान सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एका महिलेस बिबट्याचे पिल्लू दिसले. सुरूवातीला मांजरीचे पिल्लू असावे, म्हणून महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कापूस वेचताना आशा चव्हाण नामक महिलेला दुरवर बिबट दिसल्याचे तिने अन्य महिलांना सांगितले. या घटनेची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतात असलेल्या महिला व शेतक-यांनी तातडीने घरचा रस्ता धरला. चराईसाठी नेलेली जनावरे देखील त्या परिसरातून अन्यत्र हलविण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिका-यांनी परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना कोणातेही श्वापद  वा त्याचे पगमार्ग आढळून आले नाही. 

या घटनेची माहिती कळताच आम्ही सोमेश्वरनगर भागाची पाहणी केली; परंतु कुठेही परिसरात हिंस्त्र श्वापद वा ते असल्याची चिन्हे आम्हाला आढळून आली नाहीत. शेतात काम करणा-या महिलांना कदाचित भास झाला असावा. परिसरात  काही लोकं वाघ दिसल्याचीही अफवा पसरवित आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यात एकही नर वा मादी वाघ नाही.  - पी.एन. नानोटेवनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा

टॅग्स :washimवाशिमleopardबिबट्या