शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : १९ गावातील हजारो शेतकरी मंगळवारी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:26 IST

शेलूबाजार: परिसरातील १९ गावातील शेतक-यांची सोनल प्रकल्प व कालव्यासाठी दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन शासनाने संपादीत केली अनेकांना भुमीहीनसुध्दा केले; परंतु शासना व प्रशासनाच्या संगनमताने सोनल प्रकल्प अंतर्गत शेतक-यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. या प्रकाराला विरोध करण्यासाठी सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेले हजारो शेतकरी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करणार आहेत. 

ठळक मुद्देपाणी वळविण्यास विरोध‘सोनल’ प्रकल्पाचे पाणी शेतक-यांनाच देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

शेलूबाजार: परिसरातील १९ गावातील शेतक-यांची सोनल प्रकल्प व कालव्यासाठी दोन हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन शासनाने संपादीत केली अनेकांना भुमीहीनसुध्दा केले; परंतु शासना व प्रशासनाच्या संगनमताने सोनल प्रकल्प अंतर्गत शेतक-यांना सिंचनापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. या प्रकाराला विरोध करण्यासाठी सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेले हजारो शेतकरी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करणार आहेत. 

 सोनल प्रकल्पाचे पाणी इतर ठिकाणी वळविण्याच्या हालचाली सुरु आहे. सोनल प्रकल्प उभारताना अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे पाणी शेतक-यांना सिंचनासाठी राखीव राहील या पाण्यावर आरक्षण राहणार नाही, असेही नमुद केलेले असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पातील पाणी शेतक-यांच्या सिंचनासाठी हक्काचे असताना या प्रकल्पातून उपसा करुन इतर ठिकाणी हलविण्याचा शासनाने निर्धार केला आहे. शेकडो शेतक-यांच्या जमिनी  संपादीत करुन आता प्रशासनाने सदर पाणी इतर ठिकाणी हलविण्याचा कंबर कसली आहे. या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात यावे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकºयांना सिंचनासाठी झाला पाहिजे, इतरत्र वळवू नये याबाबत २४ रोजी सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने निर्णय घेतला आहे.  त्यानुसार मंगळवारी १९ गावातील हजारो शेतकरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. दरम्यान, या संदर्भात झालेल्या या बैठकीला नारायण बारड, अनिल पाटील, दत्तात्रय भेराणे, विलास लांभाडे, पांडुरंग कोठाळे, किशोर देशमुख, राहुल वानखडे, गंगादीप राऊत, भिकाजी वैद्य, प्रमोद मदार्ने, सुभाष सुंठवाल, संदीप मुळे, सुरेंद्र राऊत, गणेश सुर्वे, विनोद वैद्य, जितेंद्र बारड, निलेश सुर्वे, विनोद सुर्वे, आतिष चौधरी, संतोष सावके, हर्षद सावके, रामा सुर्वे, मंगेश सुर्वे, दुर्गेश सुर्वे, राजेंद्र भगत, संतोष लांभाडे, चंद्रकांत ठाकरे, अजय  येवले, सुनिल येवले आदि उपस्थित होते. मंगळवारी हजारोच़्या संख्येने शेतक-यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थीत रहावे असे आवाहन आयोजक सोनल प्रकल्प सिंचन बचाव समितीने केले आहे. 

टॅग्स :washimवाशिम