शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : दुसऱ्या लाटेत १५ गावांनी वेशीवरच रोखले कोरोनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:21 IST

Washim News : प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित जिल्ह्यातील १५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातही चांगलेच हातपाय पसरले; मात्र  प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित जिल्ह्यातील १५ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. दुसरी लाट ओसरत असली तरी यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरूच ठेवण्याचा मनोदय ग्रामपंचायतींनी व्यक्त केला.देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ग्रामीण भागात आढळला होता. पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील जनजीवन फारसे प्रभावित झाले नाही. पहिल्या लाटेत जिल्ह्यात ७१४३ रुग्ण आढळून आले तर १५४ जणांचा मृृत्यू झाला. फेब्रुवारी २०२१ च्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात दुसरी लाट आली. शहरासोबतच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला. मार्च ते मे या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. जिल्ह्यात ७९० च्या आसपास गावे असून १५ गावांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. कारंजा तालुक्यातील जामठी, मजलापूर, शिंगणापूर, जलालपूर, वाहितखेड, रिसोड तालुक्यातील जायखेड, सरपखेड, मोरगव्हाण, वाशिम तालुक्यातील भोयता, मानोरा तालुक्यातील डोंगरगाव, मंगरूळपीर तालुक्यातील खरबी, अंबापूर, खेर्डा खु., एकांबा, रुई आदी १५ गावांनी कोरोना वेशीवरच रोखण्यात यश मिळविले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, गावकऱ्यांचे सहकार्य, परजिल्हा, परगावावरून आलेल्या नागरिकांची गावाबाहेरच तपासणी, नियमित निर्जंतुकीकरण, कोरोनाबाधित गावांतील नागरिकांचा थेट संपर्क टाळणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर, कोरोना लसीकरण, आरोग्य विभागासह तालुका, जिल्हा प्रशासनाचे वेळोवेळी मार्गदर्शन या बळावर हे शक्य झाले आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी, आवश्यक ती दक्षता घेण्याचा मनोदय १५ गावांनी व्यक्त केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम