शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : रिसोडचे मुख्याधिकारी निलंबित! नगर विकास विभागाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 21:32 IST

रिसोड : प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्या अहवालानुसार स्थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस.एल.पानझाडे यांनी पदावर कार्यरत असताना कामकाजात गंभीर स्वरूपात अनियमितता केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश नगर विकास विभागाने ५ फेब्रुवारीला पारित केला.

ठळक मुद्देकामकाजात गंभीर स्वरूपात अनियमितता केल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्या अहवालानुसार स्थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस.एल.पानझाडे यांनी पदावर कार्यरत असताना कामकाजात गंभीर स्वरूपात अनियमितता केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश नगर विकास विभागाने ५ फेब्रुवारीला पारित केला. याप्रकरणी जिल्हा परिषद सभापती विश्‍वनाथ सानप, संतोष राजाराम भांदुर्गे यांनी तक्रारी केल्या होत्या, हे विशेष.यासंदर्भातील आदेशात पुढे नमूद आहे, की निलंबन कालावधीत मुख्याधिकारी पानझाडे यांचे मुख्यालय मुख्यालय वाशिम येथे राहील व जिल्हाधिकार्‍यांच्या पुर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय  सोडता येणार नाही. निलंबन कालावधीत  पानझाडे यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम १६ मधील तरतुदीनुसार कुठेही खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा  कोणताही व्यवसाय करता येणार नाही. असे आढळल्यास गैरवर्तणुकीबाबत त्यांना दोषी समजण्यात येवून निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क ते गमावतील.  याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार कोणत्याही वरिष्ठ प्राधिकार्‍यावर राजकीय  अथवा बाह्य  स्वरूपातील दबाव आणता येणार नाही. असा काही प्रकार आढळल्यास नियमाचे उल्लंघन झाल्याचे गृहित धरून त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.  

पानझाडेंची विभागीय चौकशी सुरू!रिसोड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना एस.एल.पानझाडे यांनी गंभीर स्वरूपातील अनियमितता केल्याचा ठपका ठेवून पानझाडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ च्या नियम ८ नुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे नगर विकास विभागाने ५ फेब्रुवारीला पारित केलेल्या आदेशात नमूद केले.

टॅग्स :washimवाशिम