शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे पालटतेय रुपडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:03 IST

वाशिम : इमारतींच्या डागडुजीसाठी शासनस्तरावरून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतींच्या डागडूजीची कामे सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे इमारतींचा वापरच न झाल्याने मूळ उद्देश असफल होण्यासोबतच मुख्य प्रवेशव्दाराला गेट नसल्याने तीनही इमारतींच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात घाण साचली होती. इमारतींकडे जाण्याकरिता तयार करण्यात आलेला ‘पेवर ब्लॉक’चा रस्ताही खराब झाला होता. इमारतीमधील इलेक्ट्रिक फिटींग पुर्णत: तोडून त्याचा केबल, स्विच यासह इतर साहित्य कुणीतरी चोरून नेले होते.

वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कर्मचारी निवासस्थानांकरिता उभारण्यात आलेल्या तीन इमारती वापराविनाच जुन्या झाल्या होत्या. साधारणत: अडीच वर्षे तशाच स्थितीत असलेल्या या इमारतींच्या डागडुजीसाठी शासनस्तरावरून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतींच्या डागडूजीची कामे सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते,  हे विशेष.जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांकरिता हक्काच्या निवासस्थानांची सोय व्हावी, याकरिता लाखो रुपये खर्चून अडीच वर्षांपूर्वी तीन भव्यदिव्य इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते. काम पुर्णत्वानंतर रितसर बांधकाम विभागाने नव्याकोºया तथा सुस्थितीमधील इमारती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे हस्तांतरित केल्या. मात्र, इमारतींचा वापरच न झाल्याने मूळ उद्देश असफल होण्यासोबतच मुख्य प्रवेशव्दाराला गेट नसल्याने तीनही इमारतींच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात घाण साचली होती, खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. इमारतींकडे जाण्याकरिता तयार करण्यात आलेला ‘पेवर ब्लॉक’चा रस्ताही खराब झाला होता. यासह इमारतीमधील इलेक्ट्रिक फिटींग पुर्णत: तोडून त्याचा केबल, स्विच यासह इतर साहित्य कुणीतरी चोरून नेले होते. एकूणच या सर्व बाबींमुळे तीनही इमारती तब्बल अडीच वर्षे याच स्थितीत विनावापर पडून होत्या. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून कोट्यवधी रुपयांच्या या इमारतींची डागडूजी झाल्यास तसेच सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा वापर होऊ शकतो, ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान, हा विषय आता मार्गी लागला असून तीनपैकी दोन इमारतींची स्वच्छता, रंगरंगोटी, इलेक्ट्रिक फिटींग, नळ फिटींग यासह इतर कामे सुरू असून संरक्षण भिंतीवर तार फेन्सींग आणि मुख्य प्रवेशव्दाराला गेट बसवून त्यावर वॉचमॅनची व्यवस्था करून दिली जात आहे. ही कामे लवकरात लवकर आटोपून पुन्हा एकवेळ चांगल्या स्थितीतील इमारती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे हस्तांतरित केल्या जातील, अशी माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.ए.चेके यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम