शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र डव्हा येथे यात्रेची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:59 IST

मालेगाव (वाशिम): विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र डव्हा येथे  १७ जानेवारीपासून परमपुज्य नाथनंगे महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या यात्रोत्सवाची जय्यत तयारी संस्थानच्यावतीने सुरू आहे. या निमित्त मंदिराची सजावट करण्यात येत असून, यात्रोत्सवातील कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी विश्वस्तांच्यावतीने नियोजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमंदिराची सजावट परिसरात साफसफाईसह कार्यक्रमांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र डव्हा येथे  १७ जानेवारीपासून परमपुज्य नाथनंगे महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या यात्रोत्सवाची जय्यत तयारी संस्थानच्यावतीने सुरू आहे. या निमित्त मंदिराची सजावट करण्यात येत असून, यात्रोत्सवातील कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी विश्वस्तांच्यावतीने नियोजन करण्यात येणार आहे.मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे नाथ नंगे महाराज संस्थान हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी आयोजित यात्रोत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक भक्त येतात, तर रथसप्तमीला पर राज्यांच्या प्रवेशानिमित्त नाथ नंगे महाराज संस्थानच्यावतीने भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख केला जातो. यंदा या यात्रेला १७ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यासाठी संस्थानच्यावतीने यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून, १७ जानेवारीपासून संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात सकाळी काकडा आरती, जीवन ग्रंथाचे पारायण, भागवत कथा वाचन, प्रवचन आदिंसह नामवंत कीर्तनकारांच्या जाहीर कीर्तनाचे कार्यक्रम येथे होणार आहेत, यात्रोत्सवाच्या समाप्तीनिमित्त २४ जानेवारीला संस्थानच्यावतीने भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १० एकर शेतात पंगतीद्वारे महाप्रसादाचे वाटप होणार असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी एक लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला संत मंडळीसह जिल्ह्यातील आमदार, खासदारांसह विविध स्थानिक स्वराज्य सस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती राहणार आह. यात्रोत्सवानिमित्त संस्थान परिसरात विविध साहित्याची दुकाने, हॉटेल्स, खेळणी, चित्रपटगृहे, साहित्य प्रदर्शनी आदिंची दुकाने थाटण्यात येणार आहेत.

टॅग्स :washimवाशिम