शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : घरकुलाची रक्कम अडकली बँकेत; लाभार्थींची पायपीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:29 IST

वाशिम : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत घरकुल योजनेची कामे करण्याकरिता लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मंजूर झाली आहे. या प्रक्रियेंतर्गत प्राप्त अनुदानातून घरकुल लाभार्थीसह घरकुलाची कामे करणार्‍या मजुरांचा मोबदला अदा करण्यासाठी जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांनी त्यांच्याकडे मंजूर रक्कम स्टेट बँकेकडे वळती केली आहे.  या प्रक्रियेला अडीच महिने झाली तरी घरकुल लाभार्थींसह तब्बल ३६७५ मजुरांच्या खात्यात ही रक्कम स्टेट बँकेने अद्यापपर्यंत जमाच केली नाही.  

ठळक मुद्देस्टेट बँकेत अडीच महिन्यांपासून निधी पडून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत घरकुल योजनेची कामे करण्याकरिता लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मंजूर झाली आहे. या प्रक्रियेंतर्गत प्राप्त अनुदानातून घरकुल लाभार्थीसह घरकुलाची कामे करणार्‍या मजुरांचा मोबदला अदा करण्यासाठी जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांनी त्यांच्याकडे मंजूर रक्कम स्टेट बँकेकडे वळती केली आहे.  या प्रक्रियेला अडीच महिने झाली तरी घरकुल लाभार्थींसह तब्बल ३६७५ मजुरांच्या खात्यात ही रक्कम स्टेट बँकेने अद्यापपर्यंत जमाच केली नाही.  विविध शासकीय योजनेंतर्गत शासनाकडून मागास आणि आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना घरकुल मंजूर करण्यात येते. या घरकुलांची कामे ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येत असते. यामध्ये संबंधित लाभार्थीला या कामात स्वत: सहभाग घ्यावा लागतो आणि त्यासाठी त्याचे जॉबकार्ड तयार करण्यात येते. लाभार्थीसह पाच ते सहा मजुरांकडून घरकुलाचे काम करण्यात येते आणि या कामाचा मोबदला म्हणून संबंधित लाभार्थी कुटुंबातील मजूर आणि इतर मजुरांना शासनामार्फत मजुरी मंजूर केली जाते. साधारण एका आठवड्याचे २४00 रुपये प्रत्येक घरकुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दिले जाते. आता जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील पंचायत समित्यांच्यावतीने घरकुल योजनेंतर्गत लाभार्थी व इतर मजुरांना देय असलेली मोबदल्याची रक्कम जवळपास अडीच महिन्यांपूर्वी स्टेट बँकेकडे वळती केली आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील मिळून ६ हजार ६७५ लाभार्थी व मजुरांच्या खात्यात स्टेट बँकेने ही रक्कम वळती केली नाही. यामुळे घरकुल लाभार्थींसह या घरकुलांची कामे करणार्‍या मजुरांवर मात्र उपासमारीची पाळी आली आहे. 

नरेगाच्या कामांच्या अहवालाची पाहणी करून बँकेकडे असलेल्या प्रलंबित रकमेबाबत जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे चौकशी करू व त्यांना याप्रकरणी संबंधित बँकेच्या शाखेवर कारवाई करण्याची सूचना करू.- सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी वाशिम (रोहयो)

घरकुल योजनेचे लाभार्थी व या योजनेत घरकुलाचे काम करणारे मजूर मिळून तालुक्यातील ३00 हून अधिक कामगारांचा मोबदला बँकेकडे पंचायत समितीने वळता केला आहे. तो अद्यापही बँकेकडून लाभार्थी आणि मजुरांच्या खात्यात वळता केला नाही. याप्रकरणी संबंधित बँकावर कारवाई करावी.-गजानन भवाने,सदस्य, पंचायत समिती मानोरा 

टॅग्स :washimवाशिम