शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वाशिम  ‘एमआयडीसी’मध्ये २५ वर्षांत उभे झाले केवळ ११ उद्योग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 17:38 IST

वाशिम : शहरापासून जवळच असलेल्या वाशिम-हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात आहे. त्यावर ९७ भुखंड पाडण्यात आले असून गेल्या २५ वर्षांत त्यापैकी केवळ ११ भुखंडांवर ११ उद्योग उभे होऊ शकले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरापासून जवळच असलेल्या वाशिम-हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात आहे. त्यावर ९७ भुखंड पाडण्यात आले असून गेल्या २५ वर्षांत त्यापैकी केवळ ११ भुखंडांवर ११ उद्योग उभे होऊ शकले. उर्वरित शेकडो एकर जागेवरील भुखंड विनावापर तसेच पडून आहेत. नियमानुसार ते परत घेवून इच्छुक उद्योजकांना देण्याची कार्यवाही व्हायला हवी. मात्र, सदर प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. वाशिम शहरानजीक वसलेल्या ‘एमआयडीसी’त कोट्यवधी रुपये खर्चून चकचकीत रस्ते, आवश्यक त्या सर्व ठिकाणी विद्यूत पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नजिकच्या धरणावरून पाणी उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याऊपरही ‘एमआयडीसी’त घेवून ठेवलेले भुखंड बांधून त्यावर उद्योग सुरू करण्याबाबत अनेकांमधून उदासिनता बाळगली जात आहे. दरम्यान, भुखंडांवर उद्योग सुरू न केल्यास दर पाच वर्षानंतर भुखंड परत घेवून त्याचा पुन्हा लिलाव करण्याची पद्धत आहे. मात्र, त्याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नव्या उद्योजकांची इच्छा असूनही आणि शेकडो एकर जागा विनावापर पडून असताना भुखंड मिळणे अशक्य झाल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. वाशिममध्ये उद्योजकांसाठी पोषक स्थिती!हैद्राबाद, नांदेड, अकोला, खंडवा, इंदूर, अमृतसर, पुणे, पंढरपूर आदी मोठ्या शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग वाशिममधून गेला आहे. याशिवाय आंध्रप्रदेशची सीमादेखील वाशिमपासून काहीच किलोमिटर अंतरावर आहे. मोठे उद्योजक व उद्योगधंद्यांसाठी ही बाब निश्‍िचतपणे पोषक ठरणारी आहे. मात्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून यासंबंधीचा प्रचार-प्रसार होणे तद्वतच विनावापर पडून असलेल्या भुखंडांची फेरलिलाव प्रक्रिया राबविली जाणे आवश्यक ठरत आहे.

टॅग्स :washimवाशिमMIDCएमआयडीसी