शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही वाशिमची बाजारपेठ बंद; कोट्यवधींची उलाढाल ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वाशिम शहरात सुरु करण्यात आलेल्या खासगी पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियमांचा त्रास होत असल्याच्या कारणावरून ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरात सुरु करण्यात आलेल्या खासगी पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियमांचा त्रास होत असल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यांनी २८ नोव्हेंबरपासून बाजारपेठ बंद ठेवली आहे. या वादावर शुक्रवारी दुपारपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. तिसऱ्या दिवशीही बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. शहरातील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणणे, पाटणी चौकातील वाहतुकीची कोंडी फोडणे आदी दृष्टिकोनातून खासगी पार्किंग व्यवस्था अंमलात आली आहे. या पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियम, अरेरावीची भाषा, विविध प्रकारचा माल घेऊन येणारी वाहने संबंधित माल उतरविण्यासाठी दुकानासमोर उभी राहताच ‘जॅमर’ लावणे आदी प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप करीत याविरोधात शहरातील व्यावसायिक संघटनांनी २८ नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. २८ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास पाटणी चौकात काही वेळ रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहून २९ नोव्हेंबरलादेखील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मोटारसायकल रॅली काढून त्यानंतर जिल्हाधिकाºयांशी चर्चाही केली. मात्र, सकारात्मक तोडगा निघाला नसल्यामुळे ३० नोव्हेंबरलादेखील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शुक्रवारला व्यापाºयांनी मोटारसायकल रॅली काढून ही पार्किंग व्यवस्था बंद करण्याची एकमुखी मागणी केली.दरम्यान, तिसऱ्या दिवशीही बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. व्यापारी आणि पार्किंग व्यवस्थापक यांच्यामधील वादाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. बाजारपेठ बंद असल्याने अत्यावश्यक ठरणाऱ्या वस्तू, साहित्याची खरेदी करण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा गैरसोय होत आहे. दोघांच्या वादात आम्हाला वेठीस का धरता? अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहेत.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार