शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम बाजारपेठ चार दिवसांपासून बंद; प्रशासनाच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी गत चार दिवसांपासून शहरातील पार्कींग व्यवस्था बंद करण्याच्या मागणीसाठी दुकाने कडकडीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी गत चार दिवसांपासून शहरातील पार्कींग व्यवस्था बंद करण्याच्या मागणीसाठी दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत. यावर प्रशासनाच्यावतिने अद्याप कोणताच ठोस तोडगा काढण्यात येत नसल्याने प्रशासन गप्प का? असा सवाल शहरातील नागरिक करीत आहेत. यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांना निवेदन देवूनही अद्याप कुठलाही निर्णय झाला नसला, तरी पार्कींग व्यवस्थापकाला ‘शो-कॉज’ नोटीस बजावण्यात आली आहे.वाशिम शहरात सुरु असलेल्या पार्कींगवाल्यांकडून वापरण्यात येत असलेली अरेरावीची भाषा, कोणताही आचार विचार न करता वाहनांवर लावण्यात आलेला कारवाईच्या सपाटयामुळे नागरिकांसह व्यापारी त्रस्त झाले आहे. गत चार दिवसापूर्वी पार्कींगमध्ये गाडी लावण्यासाठी जागा करीत असतांना रस्त्यावर काही सेकंदापुरते वाहन उभे केले असता कारवाई करण्यात आली. त्यावर वाद होवून प्रकरण चिघळले आणि त्यादिवसांपासून व्यापारी संघ, युवा व्यापारी मंडळाच्यावतिने बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. आज या घटनेला चार दिवस पूर्ण झाले . व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी कोणताही निर्णय एकदम घेता येत नसून नियमानुसार पार्कींगवाल्यांना शोकॉज देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांच्यावतिने सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका प्रशासनास पार्कींग व्यवस्थापकास सदरील प्रकरणााबाबत शो कॉज देण्याचे आदेश दिलेत. दरम्यान नगरपरिषद मुख्याधिकारी यांची बदली झाल्याने ती देण्यास विलंब झाला. शेवटी आज  शोकॉज देण्यात आली आहे. यावर आता काय उत्तर पार्कीग व्यवस्थापक देतो व त्यावर काय निर्णय होतो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत बाजारपेठ बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारशिवाय यावर निर्णय होईल असे वाटत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. या प्रकारामुळे व्यापाºयांचे तर नुकसान होतच आहे शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना सुध्दा याचा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद असतांना यावर ताबडतोब तोडगा काढणे गरजेचे असतांना प्रशासन धिम्मगतिने करीत असलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. पार्कीग व्यवस्थापकाला शो-कॉज नोटीस४पार्कीग व्यवस्थापकाच्या अरेराविची भाषा, काम करण्याची चुकीची पध्दतीमुळे पार्कीग व्यवस्था बंद करण्याच्या मागणीसाठी व्यापाºयांनी गत चार दिवसांपासून बंद पुकारला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट ही घेतली. जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर तीन दिवसानंतर पार्कींग व्यवस्थापकाला व्यापाºयांनी दिेलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शो-कॉज नोटीस देण्यात आली आहे. ४शो-कॉज् ा नोटीस शनिवारी देण्यात आल्याने व दुसºया दिवशी रविवार असल्याने यावर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बाजारपेठ बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी निर्णयावर ठाम४जोपर्यंत पार्कींग व्यवस्था बंद करण्यात येत नाही किंवा त्यांवर कोणताच तोडगा निघत नाही तोपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्याच्या निर्णयावर व्यापारी ठाम दिसून येत आहेत. यामुळे बाजारपेठवर मोठा परिणाम झाला आहे.४शहरातील बंद असलेल्या बाजारपेठेबाबत व्यापाºयांच्या दररोज मिटींग, बैठका होत असून यावर चर्चा करण्यात येत आहे. पाटणी चौकामध्ये व्यापाºयांच्यावतिने मोठा मंडप टाकण्यात आला असून दररोज येथे व्यापारी येवून आचार विचारांचे प्रदान करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार