शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : सामाजिक सभागृहात चालतोय किन्हीराजा पोलिस चौकीचा कारभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 19:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम): नजिकच्या जऊळका रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येथे गेल्या ४० वर्षांपासून पोलीस चौकी कार्यान्वित आहे. मात्र, ती चक्क एका सामाजिक सभागृहात सुरू असून मुलभूत सोयी-सुविधांचा त्याठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे स्वच्छतागृहाची सोय नसल्याने पोलिस चौकीमधील कर्मचा-यांना उघड्यावरच शौचविधी उरकावा लागतो.४२ गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ...

ठळक मुद्दे४० वर्षांपासून प्रश्न ‘जैसे थे’मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम): नजिकच्या जऊळका रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येथे गेल्या ४० वर्षांपासून पोलीस चौकी कार्यान्वित आहे. मात्र, ती चक्क एका सामाजिक सभागृहात सुरू असून मुलभूत सोयी-सुविधांचा त्याठिकाणी प्रकर्षाने अभाव आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे स्वच्छतागृहाची सोय नसल्याने पोलिस चौकीमधील कर्मचा-यांना उघड्यावरच शौचविधी उरकावा लागतो.४२ गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ४० वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या एका खोलीत सुरू झालेली किन्हीराजा येथील पोलिस मध्यंतरी सामाजिक सभागृहात हलविण्यात आली. त्याठिकाणी १० बाय १५ च्या एका खोलीत पोलिसांना कर्तव्य पार पाडावे लागत आहे. या चौकीअंतर्गत येणा-या ४२ गावांपैकी काही गावे अत्यंत संवेदनशिल असून पोलिस कर्मचा-यांना सदोदित तत्पर राहावे लागते. याशिवाय ही चौकी औरंगाबाद-नागपूर महामार्गावर असल्याने अधुनमधून घडणा-या अपघातांची प्रकरणेही हाताळावी लागतात. त्यामुळे किन्हीराजात सुसज्ज पोलिस चौकी असणे नितांत गरजेचे आहे. याकडे विद्यमान जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :washimवाशिमPolice Stationपोलीस ठाणे