शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : परजिल्ह्यातून आलेल्या ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:45 IST

२० ते २३ मार्च या दरम्यान जिल्ह्यात ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

वाशिम : परदेश, महानगरातून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती गावपातळीवर संकलित केली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांची सरकारी रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान जिल्ह्यात ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध असून, येथे ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया नागरिकांची तपासणी केली जाते. गत चार दिवसात १६०० जणांची तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

मालेगाव परजिल्ह्यातून मालेगाव तालुक्यात येणाºया नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे दिसून येताच ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली जात आहे. २० ते २३ मार्च या दरम्यान तालुक्यातील २०२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. मालेगाव शहरातील पुणे-मुंबई तसेच परदेशातून आलेल्यांपैकी केवळ पाच रुग्ण तपासणीसाठी आले आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मालेगाव नगरपंचायतने पुणे, मुंबईवरून आलेल्या कोणत्याच माणसांची नोंद ठेवली नाही तसेच त्यांना तपासणीकरिता तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात नेले नाही. मालेगाव शहरातील अनेक युवक-युवती शिक्षणासाठी पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या महानगरात गेले होते. तर काही नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबई गेले होते. आता सर्व जण परत येत असून, तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील नागरिक आरोग्य तपासणीबाबत उदासिन असल्याचे दिसून येते. केवळ पाच जणांनी आरोग्य तपासणी केली आहे.

मानोरामानोरा तालुक्यात १५ मार्च ते २३ मार्च या दरम्यान ३२६ जणांची आरोग्य तपासणी केली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. १५ मार्च रोजी पुणे व मुंबई येथून आलेल्या प्रत्येकी एक अशा दोन जणांची आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. १८ मार्च रोजी नाशिक येथून आलेले दोन नागरीक, १९ मार्च रोजी पुणे ३३ व मुंबई २३, २० मार्च रोजी पुणे २४, मुंबई २३, औरंगाबाद २, २१ मार्च रोजी पुणे ५९, मुंबई २४, नांदेड २ व अहमदनगर ९, २२ मार्च रोजी पुणे ४३, मुंबई १३, चंद्रपूर १, नागपूर २, जालना २, २३ मार्च रोजी पुणे ४६, मुंबई ९, वर्धा ३, कलकत्ता १, नागपूर ३ अशा एकूण ३२६ जणांची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.कारंजा : कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात २१ मार्च रोजी ३२९, २२ मार्च रोजी ५८ आणि २३ मार्च रोजी २०६ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कारंजा येथून कामानिमित्त तसेच शैक्षणिक कारणांसाठी अनेकजण पुणे, मुंबई यासह महानगरामध्ये गेले आहेत. कोरोना विषाणूच्या संभाव्य संसर्गापासून बचावात्मक उपाय म्हणून परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. कारंजा तालुक्यात २१ ते २३ मार्च या दरम्यान ५९३ जणांची तपासणी करण्यात आली.

मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे २१ मार्च रोजी एकूण २०७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंबई ४८, पुणे १२७, गुजरात ४, कोल्हापूर ११, अहमदनगर १०, दिल्ली १, श्रीनगर १, नागपूर ३, औरंगाबाद १, पठाणकोट १ यांचा समावेश आहे. २२ मार्च रोजी एकूण ३३ जणांची आरोग्य तपासणी केली असून, यामध्ये अकोला ३, मुंबई १६, पुणे १२, मेहकर २ यांचा समावेश आहे. २३ मार्च रोजी एकूण ८८ जणांची आरोग्य तपासणी केली असून, यामध्ये पुणे ४० आणि मुंबई येथून आलेल्या ४८ नागरिकांचा समावेश आहे.रिसोड : रिसोड तालुक्यात २१ मार्च रोजी १०, २२ मार्च रोजी ७३ आणि २३ मार्च रोजी १५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. परजिल्ह्यातून रिसोड तालुक्यात येणाºया नागरिकांनी आरोग्य विभागाला माहिती देवुन तपासणी करुन घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस