शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू चाचणीसाठी वाशिमला प्रयोगशाळाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:04 IST

Washim has no laboratory for dengue testing : शासकीय प्रयोगशाळा नसल्याने आणि खासगी लॅबमध्ये एका हजारावर दर आकारले जात असल्याने गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. 

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात सध्या हिवताप, डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले असून, लवकर निदान व्हावे, याकरिता रक्त नमुने चाचणीचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. डेंग्यू चाचणीसाठी जिल्ह्यात शासकीय प्रयोगशाळा नसल्याने आणि खासगी लॅबमध्ये एका हजारावर दर आकारले जात असल्याने गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. पावसाची अनियमितता आणि वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या साथरोग उद्भवत आहेत. त्यातच अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव, धूर फवारणीचा अभाव आदी बाबी भर टाकत आहेत. कोरोना नियंत्रणात असला तरी ताप, सर्दी, खोकला, मलेरिया, विषमज्वर, डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले. साथरोगावर वेळीच निदान व उपचार व्हावे, याकरिता रक्त नमुने चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. वाशिम शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात मलेरिया चाचणी केली जाते. मात्र, डेंग्यू चाचणीसाठी शासकीय प्रयोगशाळा नसल्याने रुग्णांना खासगी लॅबमध्ये रक्त तपासणीची वेळ आली आहे. डेंग्यू, मलेरिया चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये ११०० ते १४०० रुपयांदरम्यान दर आकारणी केली जाते. ही रक्कम सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकजण चाचणी करण्याचेही टाळत असल्याचे दिसून येते. कोरोनाकाळात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना चाचणीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात आली. ऑक्सिजन प्लांटही साकारले आहेत; या पार्श्वभूमीवर डेंग्यू चाचणीसाठी जिल्ह्यातच प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध झाली तर रुग्णांची गैरसोय टळणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष द्यावे, असा सूर जिल्हावासीयांमधून उमटत आहे.

डेंग्यू चाचणीचा अहवाल येण्यास विलंबडेंग्यू चाचणीसाठी वाशिम येथे रक्त नमुने घेतल्यानंतर अकोला येथील शासकीय प्रयोगशाळेत रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. दोन ते चार दिवसांनी या नमुन्याचा अहवाल प्राप्त होतो. या दरम्यान रुग्णावर कोणता उपचार करावा? असा पेच डॉक्टरांना पडतो. 

लॅबमध्ये समान दर का नाहीत?विविध प्रकारच्या रक्त नमुने चाचण्यांसाठी शहरातील प्रत्येक लॅबमध्ये वेगवेगळे दर आकारले जातात. त्यामुळे रुग्णांची लुबाडणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. रुग्णांची आर्थिक पिळवणूक तसेच प्रयोगशाळांनादेखील आर्थिक तोटा होऊ नये म्हणून प्रत्येक लॅबमध्ये एकसमान दर आकारणी व्हावी तसेच दर्शनी भागात दरपत्रक लावण्यात यावे, असा सूर रुग्णांमधून उमटत आहे. 

टॅग्स :washimवाशिमdengueडेंग्यू