शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: जिल्ह्यात पुन्हा गारपीट अन् अवकाळीचा तडाखा, शेतपिकांचं मोठं नुकसान

By संतोष वानखडे | Updated: April 25, 2023 17:51 IST

अनेक ठिकाणी घरांची पडझड होण्यासह मोठमोठे वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या.

संतोष वानखडेवाशिम: जिल्ह्यात मंगळवार २५ एप्रिल रोजी अनेक भागांत वादळीवारा आणि जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत शेतीपिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्याला फटका बसला आहेच; शिवाय अनेक ठिकाणी घरांची पडझड होण्यासह मोठमोठे वृक्ष कोसळण्याच्या घटनाही घडल्या.मागील काही दिवसांपासून निसर्ग जणू कोपल्याचेच दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात वारंवार वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानातून शेतकरी सावरला नसतानाच मंगळवारी (दि. २५ ) पुन्हा जिल्ह्यातील अनेक भागांत वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला.

यात शेतीपिके नेस्तनाबूत झाली, तर घरांची पडझड हाेण्यासह वृक्षही कोसळले. काटा- किन्हीराजा मार्गावर पुन्हा वृक्ष कोसळल्याने वाहतूकही खोळंबली होती. नुकसानाचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिम