लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा तालुक्यातील शहा येथील अल्पवयीन दोन मुलींना शेजारच्या मुलाने घरात बोलावून मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. संदीप आनंदा धायगुडे रा. शहा असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिडीत मुलीच्या नातेवाईक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन अल्पवयीन चुलत बहिणी शाळेतून घरी परत येत असताना, आरोपी संदीप धायगुडे याने दोन्ही अल्पवयीन मुलींना काही कारणाने घरात बोलाविले. १० व ९ वर्षाच्या या अल्पवयीन मुलींना आरोपीने मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखविला. या प्रकाराची माहिती पिडीत मुलींनी घरातील महिलांना दिली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईक महिलेने ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. गुरूवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
वाशिम : अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:24 IST
कारंजा तालुक्यातील शहा येथील अल्पवयीन दोन मुलींना शेजारच्या मुलाने घरात बोलावून मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. संदीप आनंदा धायगुडे रा. शहा असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाशिम : अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ठळक मुद्देआरोपीला अटक शहा येथील घटना