शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम :  'सोशल डिस्टन्सिंग'चे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 15:21 IST

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केल्या जात आहेत मात्र नागरिक याकडे कानडोळा करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  शासनाकडून सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.पण नागरिकांकडून दिलेल्या सुचनांची पायमल्ली केली जात आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाºया दुकानांवर, भाजीबाजारात खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केल्या जात आहेत मात्र नागरिक याकडे कानडोळा करताना दिसून येत आहेत.लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हयाच्या सिमा बंद करण्यात आल्या असून तालुक्याच्या बाजुला असलेल्या यवतमाळ तसेच अकोला , बुलढाणा जिल्हयात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. प्रशासनाने जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता पावले उचलली असून संपूर्ण जिल्हा सिमा बंदी केली. तसेच नागरिकांनाही गर्दी टाळण्याचे , मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परिस्थिती गंभीर असून जनतेने सावध राहण्याचे प्रशासनाच्यावतिने कळकळीचे आवाहन केल्या जात असले तरी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहे. याकरिता प्रशासनाने कठोर होणे गरजेचे झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतिने संपूर्ण जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक कामासाठी केवळ सकाळी ८ ते १२ सूट देण्यात आली आहे. या सूटमध्ये नागरिक चक्क घराबाहेर पडून फिरतांना दिसून येत आहेत. पोलीसांनी हटकलेच तर मेडिकल, दूध, भाजीपाला आणायला जात असल्याचे सांगितले जात आहे.

दररोज भाजी घेणाºयांच्या संख्येत वाढ४शहरातील अनेक जण संचारबंदी लागू झाल्यापासून दररोज भाजीपाला खरेदीसाठी जात असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक नागरिक संचारबंदीपूर्वी कधी भाजीपाला आणत नव्हते परंतु ते आज आवर्जुन भाजीपाला खरेदीसाठी बाजारात फिरत असल्याचे चर्चेवरुन पुढे आले आहे. अनेक नागरिक दर आठवडी बाजारातून सप्ताहभराचा भाजीपाला खरेदी करुन ठेवत होते, परंतु संचारबंदीत फिरायचे म्हणून केवळ भाजीपाला खरेदीसाठी निघत असल्याचे चित्र आहे.

पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे जिल्हा प्रशासनाच्यावतिने कळकळीचे आवाहन करुनही नागरिक रस्त्यावर येत असल्याने आता पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया अनेक मान्यवरांच्यावतिने व्यक्त केल्या जात आहेत. संचारबंदीत सकाळी ८ ते १२ ची शिथीलता एक किंवा दोन दिवसाआड करावी जेणे करुन रस्तयावर गर्दी होणार नाही असे काही जणांमध्ये बोलल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिम