शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: तुरीला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:38 IST

वाशिम:  जिल्ह्यातील व्यापारी अत्यंत कमी दराने तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह जिल्हा उपनिबंधकांनाही निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह जिल्हा उपनिबंधकांनाही निलंबित करण्याची मागणी.जिल्हा उपनिबंधकांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तूर विक्रीमुळे झालेले नुकसानही त्वरीत भरून देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. 

 

वाशिम:  जिल्ह्यातील व्यापारी अत्यंत कमी दराने तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह जिल्हा उपनिबंधकांनाही निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यावतीने निवेदन सादर करुन जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

यंदा शासनाने तुरीला बोनस मिळून ५४०० रुपये हमीभाव जाहीर केला असतानाही व्यापारी तुरीची खरेदी त्यापेक्षा खूप कमी दराने करीत आहेत. शेतकरी आधीच विविध नैसर्गिक संकटांनी बेजार झाला असताना बाजार व्यवस्थेकडून त्याची पिळवणुक होत आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालय मात्र काहीच बोलायला तयार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले, तसेच व्यापाऱ्यां वर गुन्हे दाखल करण्यासह जिल्हा उपनिबंधकांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यां ची पिळवणूक थांबविण्यासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी सुरू करून यापूर्वी तूर विक्रीमुळे झालेले नुकसानही त्वरीत भरून देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. 

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय