शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

Washim: मतदानाचा हक्क बजावा; ७१५०५ घरांवर लिहिला संदेश, वाशिम जिल्हा परिषदेचा उपक्रम

By संतोष वानखडे | Published: April 24, 2024 1:02 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकशाहीच्या निवडणुकीचा उत्सव अवघ्या एका दिवसावर आला असून, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनदेखील सरसावले आहे. जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या मदतीने तब्बल ७१ हजार ५०५ घरांच्या दरवाजावर मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश लिहिला आहे.

- संतोष वानखडेवाशिम - लोकशाहीच्या निवडणुकीचा उत्सव अवघ्या एका दिवसावर आला असून, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनदेखील सरसावले आहे. जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या मदतीने तब्बल ७१ हजार ५०५ घरांच्या दरवाजावर मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश लिहिला आहे.

जिल्ह्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, लोकशाही मजबूत करण्याकरिता मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या संकल्पनेतून आशा स्वयंसेविकांनी मतदान जनजागृतीचा विडा उचलला आहे. गावातील प्रत्येक घरी जाऊन आशा स्वयंसेविका मतदान करण्यासाठी आवाहन करीत आहेत. या आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन मतदानाबाबत लोकांचे समुपदेशन करीत आहेत तसेच भेट दिलेल्या घरांच्या भिंतीवर अथवा दरवाजावर याबाबत संदेशही लिहीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१ हजार ५०५ घरांच्या दरवाजा/भिंतीवर संदेश लिहिण्यात आला. या संदेशामध्ये ‘मतदान हे दान नसून आपल्यावर कोण राज्य करेल हे निवडण्याचा अधिकार आहे, तो अधिकार बजावा’ असा मजकूर लिहिला जात आहे. आशा स्वयंसेविकांच्या या राष्ट्रीय कामाचे कौतुक जि. प. चे सीईओ वैभव वाघमारे यांनी केले.

 कोणत्या तालुक्यात किती भींती/दरवाजावर संदेश लिहिला?

तालुका / संख्या- मंगरूळपीर - १५७४४- रिसोड- १६३५३- मालेगाव - ५०२७- कारंजा - १०८९५- मानोरा - २०५०- वाशिम - २१४३६

टॅग्स :washimवाशिमmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४