शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा तूर्तास ‘कोरोना’मुक्त; सोमवार पासून व्यापार सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 10:52 IST

जिल्ह्यातील व्यापार पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून राज्यशासनाच्या अधिकृत निर्देशानंतरच यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीची प्रभावी उपाययोजना म्हणून मार्च महिन्यातील २५ तारखेपासून सुरू असलेला ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपुष्टात येणार आहे. यामुळे ‘कोरोना’मुक्त असलेल्या वाशिम जिल्ह्यातील व्यापार पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून राज्यशासनाच्या अधिकृत निर्देशानंतरच यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शनिवार, २ मे रोजी दिली.वाशिम जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोली या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातुलनेत वाशिम जिल्ह्यात एकमेव मेडशी येथे एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळला होता. त्याचाही अंतीम अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने जिल्हा ‘कोरोना’मुक्त होण्यासह ‘ग्रीन झोन’मध्ये समाविष्ट झाला आहे. यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ४ मे पासून जिल्ह्यातील उद्योगधंदे, सलूनची दुकाने, शेतीविषयक सर्व कामे, मद्यविक्रीची दुकाने, आॅटो, टॅक्सी सुरू करण्यास मुभा मिळणार आहे; तर चित्रपटगृहे, हॉटेल्स, शाळा-महाविद्यालये, रेल्वे सद्यातरी बंदच असणार आहे. असे असले तरी यासंबंधी राज्यशासनाकडून अधिकृतरित्या निर्देश मिळत नाहीत, तोपर्यंत ‘लॉकडाऊन’ हटवून व्यापारी पुन्हा सुरू करण्यासंबंधीचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी शनिवारी स्पष्ट केले. यामुळे व्यापाऱ्यांसोबतच नागरिकही संभ्रमात सापडले आहेत.

खबरदारी घेण्याची गरजजिल्ह्यात अद्यापपर्यंत केवळ मेडशी येथील एकमेव कोरोनाबाधीत रुग्णाचा अपवाद वगळता अन्य कुठेही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे जिल्हा ‘कोरोना’मुक्त असण्यासह ‘ग्रीन झोन’मध्ये समाविष्ट आहे. असे असले तरी धोका अजून टळला नसल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाकडून ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला. तो ४ मे पासून हटवायचा किंवा कसे, यासंबंधी राज्यशासन निर्णय घेणार आहे. शासनाकडून सद्यातरी सूचना नाहीत. अधिकृतरित्या निर्देश मिळाल्यानंतरच वाशिम जिल्ह्यात तशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल.- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या