शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

वाशिम जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:28 IST

मालेगाव: तीन वर्षांपूर्वी नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयालाच विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.

ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी सुसज्ज इमारतीत मालेगाव ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाले. अल्पावधीतच येथे भौतिक असुविधा व वैद्यकीय उपकरणांची उणिव जाणवते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला सकाळी १० वाजताच्या सुमारास भेट देऊन आढावा घेतला.

मालेगाव: तीन वर्षांपूर्वी नवीन इमारतीत स्थलांतरित झालेल्या मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयालाच विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.तीन वर्षांपूर्वी सुसज्ज इमारतीत मालेगाव ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाले. अल्पावधीतच येथे भौतिक असुविधा व वैद्यकीय उपकरणांची उणिव जाणवते. येथे जनरेटरची सुविधा नाही. त्यामुळे वीजपुरवठा गूल झाला तर रात्री रूग्णांना अंधारातच राहावे लागते. ‘इसीजी’ मशिन बंद आहे. पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनच अनेक ठिकाणी नादुरूस्त आहे. परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. यासह वैद्यकीय अधिकारी  व कर्मचारीदेखील सोयीनुसार रूग्णालयात येत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकही प्रभारी असून, तेदेखील गत काही दिवसांपासून मालेगावात आलेच नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला सकाळी १० वाजताच्या सुमारास भेट देऊन आढावा घेतला. कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचाºयांनी रूग्णालयातच राहावे, अशा सूचना देतानाच, दांडीबाज कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, असा इशाराही डॉ. राऊत यांनी दिला. तसेच मालेगाव येथील प्रभारी अधीक्षकपदाचा डॉ. अविनाश झरे यांच्याकडून काढला जाईल आणि सदर प्रभार अन्य वैद्यकीय अधिकाºयांकडे सोपविला जाईल, असेही डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. मालेगाव ग्रामीण रुग्णालयात भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जातील. रूग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल