शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात हेल्मेट सक्ती कायद्याच्या अंमलबजावणीस खीळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:51 IST

या मोहिमेला पुन्हा खीळ बसली असून नागरिकांसोबतच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांमधूनही ‘हेल्मेट’ वापराबाबत उदासिनता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्ह्यात डिसेंबर २०१८ च्या पहिल्या आठवड्यात काहीअंशी अंमलबजावणी करत ‘हेल्मेट’ परिधान न करता वाहन चालविणाºया ७४ दुचाकीस्वारांकडून उपप्रादेशिक परिवहन विभागाने ६० हजारांच्या आसपास दंड वसूल केला. मात्र, त्यानंतर या मोहिमेला पुन्हा खीळ बसली असून नागरिकांसोबतच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांमधूनही ‘हेल्मेट’ वापराबाबत उदासिनता बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवरील अपघातात होणाºया मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दुचाकी वाहन चालकांसाठी ‘हेल्मेट’ परिधान करणे सक्तीचे केले आहे. मात्र, या निर्णयाची ठोस अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात होेणे अशक्य ठरत आहे. मध्यंतरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, वाहतूक शाखा व अन्य प्रशासकीय यंत्रणांनी दंडात्मक कारवाईची मोहिम हाती घेतली. मात्र, ती काही दिवस सुरू ठेवून पुन्हा बंद करण्यात आल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. 

अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचा निर्णय हवेतच विरलाडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासोबतच १ जानेवारी २०१९ पासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती केली जाणार होती. त्यानुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकीधारक अधिकारी, कर्मचाºयांची माहिती संकलीत करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र प्रशासकीय विभागातील एकाही अधिकारी, कर्मचाºयाने हेल्मेट सक्तीचा कायदा गांभीर्याने घेतलेला नाही. आरटीओ व पोलीस पथक सरकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन तपासणी करणार होते. त्याची अंमलबजावणीही झाल्याचे कुठे दिसत नाही.  

प्रशासकीय विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांची संख्या यासह अन्य माहिती संकलित करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून फेब्रूवारीच्या सुरूवातीपासूनच सर्वांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले जाणार आहे. याशिवाय नागरिकांनीही स्वसुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. - जयश्री दुतोंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिम