शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

वाशिम जिल्ह्यात नव्याने केवळ ५६ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 11:40 IST

Corona Cases in Washim : गेल्या कित्येक दिवसांनंतर प्रथमच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडाही हजाराच्या खाली उतरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात सोमवार, ७ जूनरोजी नव्याने केवळ ५६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातुलनेत १५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, गेल्या कित्येक दिवसांनंतर प्रथमच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडाही हजाराच्या खाली उतरला आहे. या आशादायक चित्रामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला असून, कोरोना संसर्गाचे संकट ओसरू लागल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ या महिन्यापासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. ती तुलनेने अधिक तीव्र ठरली. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच गेली. मध्यंतरी दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा ३०० ते ४०० पेक्षा अधिकच राहिला; मात्र २८ मे पासून कोरोनाचे संकट हळूहळू ओसरायला लागल्याचे दिसून येत आहे. १ जूनपासून दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या शंभराच्या खाली उतरली आहे; तर ७ जूनरोजी केवळ ५६ जण कोरोनाबाधित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे. दुसरीकडे ‘ॲक्टिव्ह’ अर्थात शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. ७ जूनच्या अहवालानुसार जिल्हाभरात केवळ ८८२ कोरोनाबाधित रुग्ण उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल आहेत; तर आज कोरोना संसर्गाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. ७ जूनरोजी प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहर व तालुक्यात २०, मालेगाव शहर निरंक; तर तालुक्यात केवळ ३, रिसोड शहर निरंक व तालुक्यात ५, मंगरूळपीर शहर निरंक व तालुक्यात ७, कारंजा शहरात ५; तर तालुक्यात ६ आणि मानोरा शहर निरंक व तालुक्यात केवळ ५ रुग्ण बाधित आढळले आहेत. जिल्ह्याबाहेरील पाच बाधितांचीही नोंद घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ओसरत चालले असले, तरी नागरिकांनी गाफील न राहता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या