शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा : दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी केवळ १२ लाखांचा निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 15:17 IST

वाशिम - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता.

ठळक मुद्दे२०१५-१६ या वर्षात २४.४५ लाख, सन २०१६-१७ या वर्षात २२ लाख अशी तरतूद होती. सन २०१७-१८ या वर्षात केवळ १२ लाख रुपयांची तरतूद आहे. अल्प निधीचा आता आरोग्य विभागाला फटका बसत असल्याचे दिसून येते.

वाशिम - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ १२ लाख रुपयांचा निधी असल्याने लाभार्थींना लाभ देताना दमछाक होत आहे. गतवर्षी हाच निधी २२ लाख रुपये असा होता.नानाविध कारणांमुळे मानवाला विविध प्रकारचे दुर्धर आजार जडत आहेत. गोरगरीब रुग्णांना कर्करोग, हृदयरोग, किडनीचा विकार यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचाराचा खर्च झेपावणारा नसल्याने शासनाने सरकारी दवाखान्यांची सुविधा उपलब्ध केली. याबरोबरच गोरगरीब रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून १५ हजारांचे आर्थिक साहाय्यदेखील दिले जाते. राज्य शासनाने नमूद केलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त रुग्णांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर साधारणत: एका महिन्याच्या आत या प्रस्तावाची पडताळणी आणि मंजुरात या प्रशासकीय बाबी पूर्ण होतात. त्यानंतर संबंधित रुग्णांना उपचारासाठी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.  जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात या भरीव निधीची तरतूद केल्या जाते. दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना आर्थिक मदत देणे या लेखाशिर्षाखाली सन २०१४-१५ मध्ये ३० लाख रुपये निधीची तरतूद होती. सन २०१५-१६ या वर्षात २४.४५ लाख, सन २०१६-१७ या वर्षात २२ लाख अशी तरतूद होती. सन २०१७-१८ या वर्षात केवळ १२ लाख रुपयांची तरतूद आहे. अल्प निधीचा आता आरोग्य विभागाला फटका बसत असल्याचे दिसून येते. दुर्धर आजारग्रस्त रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम