शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘कुपोषण निर्मूलना’त राज्यात वाशिम जिल्हा अव्वल

By संतोष वानखडे | Updated: July 14, 2024 15:59 IST

कुपोषणामागे विविध कारणे कारणीभूत आहेत. कुपोषणाच्या श्रेणीतून बालकांना बाहेर काढण्यासाठी सन २०२३ पर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनेकवेळा ठोस प्रयत्न झाले.

वाशिम : कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी गत सहा महिन्यांत जिल्हा परिषद प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेची फलश्रूती झाली असून, कुपोषण निर्मूलनात राज्यात वाशिम जिल्हा अव्वल ठरला आहे. पाच महिन्यात ११५७४ बालके कुपोषणमुक्त झाली असून, याची सरासरी टक्केवारी ७३ आहे.

कुपोषणामागे विविध कारणे कारणीभूत आहेत. कुपोषणाच्या श्रेणीतून बालकांना बाहेर काढण्यासाठी सन २०२३ पर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनेकवेळा ठोस प्रयत्न झाले. अधिकाऱ्यांनी कुपोषणग्रस्त बालके दत्तकही घेतली होती. परंतू, कुपोषणमुक्तीच्या या लढ्याला अपेक्षित यश आले नव्हते. जानेवारी २०२४ नंतर मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी या कुपोषित बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी ठोस त्रिसूत्री कार्यक्रम आखला.

येणाऱ्या १५ ऑगस्टपर्यंत जिल्हा उपोषण मुक्त करण्यासाठी सीईओ वाघमारे यांनी महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या समन्वयातून फेब्रुवारी महिन्यापासून कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली. त्यावेळी जिल्ह्यात  सॅम,  मॅम, एसयुडब्ल्यु आणि एमयुडब्ल्यु या चार प्रकारातील एकुण कुपोषित बालकांची संख्या १३ हजार ५१५ होती. मागील पाच महिन्यांत राबविलेल्या या मोहिमेची फलश्रूती आता दृष्टिपथास येत असून, ११५७४ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. आता १९४१ बालके कुपोषित आहेत. त्यातही अति तीव्र श्रेणीतील (सॅम) कुपोषित बालकांचे प्रमाण तीन तालुक्यात शुन्यावर आले असुन उर्वरित तीन तालुक्यामध्ये सॅम श्रेणीत १६ बालके आहेत. ‘कुपोषण निर्मूलना’त राज्यात वाशिम जिल्हा अव्वल ठरल्याने नागरिकांमधून जिल्हा परिषद प्रशासनाप्रती कौतुकास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत.

कुपोषण निर्मूलनाच्या या मोहिमेत मालेगाव आणि वाशिम तालुक्याने आघाडी घेतली आहे. उर्वरित तालुक्यांनीही असेच काम केल्यास येणाऱ्या १५ ऑगस्टपूर्वी वाशिम जिल्हा संपूर्णपणे कुपोषण मुक्त होईल असा विश्वास वाटतो.- वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

एकूण कुपोषित बालकांचा तुलनात्मक तक्ता

तालुका / जानेवारी २०२४ / जून २०२४

वाशिम / २१५२ / ३३रिसोड / १८६१ / ४५२मालेगाव / ३५८१ / ७४मं.पीर / १४८३ / ४००कारंजा / १५६० / १८६मानोरा / २८७८ / ७९६एकूण /१३५१५ / १९४१

टॅग्स :washimवाशिम