शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:36 IST

वाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, २५ सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यात ८७.५७, मालेगाव ९७.१२, रिसोड ८१.६२, मंगरूळपीर १०२, मानोरा ९३.३३ आणि कारंजा तालुक्यात १०८.४१ टक्के पर्जन्यमान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकबुर्जी आणि सोनल या मध्यम प्रकल्पांसह अधिकांश लघूप्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. असे असले तरी मध्यंतरी पावसाने मारलेली दीर्घ दडी आणि पिकांवर झालेल्या विविध स्वरूपातील किडींच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबिनपासून विशेष उत्पन्न हाती पडणार नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मात्र, सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने आगामी रब्बी हंगामात महावितरणने साथ देवून पुरेशा प्रमाणात वीज पुरविल्यास गहू, हरभरा यासह अन्य पिकांपासून विक्रमी उत्पन्न घेणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारच्या पावसाचा सोयाबिनला फटका; तूर, कपाशीला जीवदान!जिल्ह्यात सोमवार, २५ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ऐन सोेंगणीच्या स्थितीत आलेल्या सोयाबिनला जबर फटका बसला; तर तूर आणि कपाशीला हा पाऊस जीवनदान देणारा ठरला. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोयाबिन सोंगणीला सुरूवात झाली आहे. अशातच सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकºयांची एकच धावपळ उडाली. अनेकांचे सोंगलेले सोयाबिन पावसामुळे खराब झाले असून सरासरी उत्पन्नात यामुळे मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमmonsoon 2018मान्सून 2018