शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचे जिल्हा सामान्य रुग्णालय बनले वाहनतळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 14:13 IST

वाशिम :  जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जड वाहनांसह मोटारसायक ठेवण्याचे स्थळ बनले असून याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.

ठळक मुद्दे शिक्षक व ईतर कर्मचारी चक्क आपली वाहने जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी नेवून ठेवतात. ट्रक सुध्दा सद्यस्थितीत रुग्णालयाच्या परिसरातच उभे राहताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जड वाहनांसह मोटारसायक ठेवण्याचे स्थळ बनले असून याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्यव्दारापासून ते अपघात कक्षापर्यंत खूप मोठा रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला शहरात आलेले ट्रक, मिनी ट्रक, टेम्पो, कार व मोटारसायकलस्वार आपली वाहने ठेवून दिवसदिवसभर गायब राहत आहेत. यामध्ये अनेक अपडाऊन करणाºया कर्मचाºयांचाही सहभाग दिसून येतो. रुग्णालयाच्या जवळच अकोला नाका असून येथून मालेगाव, शिरपूर, डोंगरकिन्ही, मेहकर, अकोल्यासह ईतर गावासाठी बस थांबा आहे. शहरातून या गावी जाणारे अनेक शिक्षक व ईतर कर्मचारी चक्क आपली वाहने जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी नेवून ठेवतात. कर्तव्य बजावून झाल्यानंतर संध्याकाळी येथे येवून पुन्हा घेवून जात आहेत. याशिवाय शहरात आलेले ट्रक सुध्दा सद्यस्थितीत रुग्णालयाच्या परिसरातच उभे राहतांना दिसून येत आहेत. ही वाहने तास-न-तास उभे राहत असतांना सुध्दा याकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही. विशेष म्हणजे या वाहनाला येथे थांबण्यासाठी कोणीच अटकाव करीत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय वाहन तळ बनल्याचे दिसून  येत आहे. यांसदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या भ्रमणध्वनीवर पूर्ण रिंग गेली परंतु त्यांनी उचलला नाही.अत्यवस्थ रुग्णावर उपचारास होवू शकतो विलंबजिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातासह अनेक अत्यवस्थ रुग्ण रुग्णवाहिकेतून आणल्या जातात. यावेळी रस्त्याच्या मधात किंवा बाजुला एकसारखी उभ्या असलेल्या वाहनांमुळे  अत्यवस्थ रुग्णांवर उपचारास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल