शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे ‘वराती मागून घोडे’ : आधी कार्यक्रम नंतर प्रदर्शनीचे  उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:59 IST

वाशिम :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची जिल्हा प्रदर्शनी व विक्री २९ मार्च ते ३१ मार्च जुन्या जिल्हा परिषद परिसरात सुरु करण्यात आली. यामध्ये मात्र २९ मार्चला कार्यक्रम पार पडला व ३० मार्च रोजी या कार्यक्रमाचे रितसर उदघाटन करण्यात येणार आहे

ठळक मुद्दे२९ ते ३१ मार्चपर्यंत आयोजित कार्यक्रमाची माहिती जवळपास सर्वांनाच २९ मार्चच्या पूर्वसंध्येला झालेली दिसून आली. परंतु २९ मार्चला काय कार्यक्रम आहेत हे सोडून ३० मार्चला उदघाटन व ३१ मार्चला समारोपाचा उल्लेख करण्यात आला आहे.

 नंदकिशोर नारे । 

वाशिम :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची जिल्हा प्रदर्शनी व विक्री २९ मार्च ते ३१ मार्च जुन्या जिल्हा परिषद परिसरात सुरु करण्यात आली. यामध्ये मात्र २९ मार्चला कार्यक्रम पार पडला व ३० मार्च रोजी या कार्यक्रमाचे रितसर उदघाटन करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होत असून हा प्रकार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ नेण्याचा प्रकार आहे.

कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन म्हटले की पूर्वतयारी दिसून येते. परंतु जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत २९ ते ३१ मार्चपर्यंत आयोजित कार्यक्रमाची माहिती जवळपास सर्वांनाच २९ मार्चच्या पूर्वसंध्येला झालेली दिसून आली. या कार्यक्रमाची पत्रिका प्रकाशित करण्यात आली त्यामध्ये सुध्दा २९ ते ३१ मार्च कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला. परंतु २९ मार्चला काय कार्यक्रम आहेत हे सोडून ३० मार्चला उदघाटन व ३१ मार्चला समारोपाचा उल्लेख करण्यात आला आहे. जर ३० मार्चला उदघाटन करायचे होते तर मग २९ मार्चपासून कार्यक्रमाची रुपरेषा आखण्याचे काय काम अशी चर्चा यानिमित्ताने जोर धरत आहे.

या प्रदर्शन कालावधीत संबधित अधिकारी , कर्मचारी यांना त्यांच्या कामाची जबाबदारी सुध्दा सोपविण्यात आली. यामध्ये स्वागत समिती व संपर्क समिती, पत्रिका वाटप समिती प्रमुख जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिक्षक पी.एन. नांदे तर त्यांना सहायक कर्मचारी म्हणून एम.जी. नायक, अभिजित सिरसाट, वाय.आर. चोपडे, शाम मापारी यांचा समावेश आहे. स्टॉल देखरेख समितीमध्ये समितीप्रमुख एस.एस. जगताप, नियंत्रण , नोंदणी व कंट्रोल रुम प्रमुख एस.व्ही. पवार , प्रसिध्दी समिती राम श्रृंगारे, निवास देखरेख समिती जे.पी. सारसकर, भोजन समिती एस. जी. कडेकर, सांस्कृतीक समिती एम. जी. नायक, अहवाल लेखन समिती प्रमुख नागेश थोरात व सहायक म्हणून कर्मचारी देण्यात आले आहेत. 

 

पालकमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने आधी कार्यक्रम नंतर उदघाटन

- २९ मार्चपासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन ३० मार्च रोजी ठेवण्यामागे पालकमंत्री यांच्या व्यस्त कामामुळे ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

- २९ मार्च रोजी अस्मिता योजनेबाबत सकाळी ११.३० वाजता जनजागृती करण्यात आली. यावेळी स्टॉल उभारण्याचे काम दिसून आले तर केवळ एक चहाचे स्टॉल दिसून आले.

- याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन एस. माने यांच्याशी सपंर्क साधला असता दोन वेळा त्यांनी भ्रमणध्वनी कट केला.

‘अस्मिता’ स्वच्छता व आरोग्याचा आयाम चित्ररथ यात्रेतर्फे जनजागृती

अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण भागात महिलांना अस्मिता या ब्रँड नावाने माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यात येत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रदर्शनीस्थळी २९ मार्च रोजी सकाळी ११.१५ वाजता ‘अस्मिता’ स्वच्छता व आरोग्याचा आयाम चित्ररथ दाखल झाला होता. यावेळी जनजागृती करण्यात आली. येथे मात्र केवळ आयोजक मंडळीतील काही कर्मचारी यांचाच समावेश दिसून आला. अस्मिता योजनेची चमू पलिकडे येथे कोणीच नसल्याने या चित्ररथा जनजागृतीचा फायदा तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद