शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला वृक्षलागवड मोहिमेचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:28 IST

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.

जिल्ह्यात ४२.३३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट : सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतील अंतिम टप्पा असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याला ४२ लक्ष ३३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे यांच्यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, १ जुलै ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याला प्राप्त झालेले उद्दिष्ट सर्व शासकीय विभागांना विभागून देण्यात आले आहे. या उद्दिष्टानुसार सर्व यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही सुरु करावी. या मोहिमेत सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा परिषदेचे भुमिका महत्त्वाची असून त्यांनी त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करावे. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या शेतक?्यांच्या बांधावर वृक्ष लागवड योजनेतून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सहाय्यक वन संरक्षक  वायाळ यांनी यंत्रणानिहाय उद्दिष्ट व मोहिमेचे नियोजन याविषयी माहिती दिली.

टॅग्स :washimवाशिमcollectorजिल्हाधिकारी