शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 14:14 IST

वाशिम:  २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मतदार दिनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोक शाही मजबूत करावी, या उद्देशाने पुढील आठवड्यापासून जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या  मतदान दिनाच्या औचित्यावर जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी मोहिम राबविण्याचे ठरविले आहे.या अंतर्गत पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळा, महाविद्यालयात स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तालुका आणि ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून फलकांद्वारे लोकांना मतदानाचे महत्त्व पटविण्यात येणार आहे.

वाशिम:  २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या  मतदार दिनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोक शाही मजबूत करावी, या उद्देशाने पुढील आठवड्यापासून जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. या अंतर्गत पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळा, महाविद्यालयात स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रि येला अनन्य साधारण महत्त्व आहे. मतदानाचा टक्का वाढल्यानंतरच जनमत स्पष्ट होते. घटणारे मतदानाचे प्रमाण लोकशाहीसाठी घातकच  असते. तथापि, प्रत्यक्ष मतदान प्रक्रि येत सहभागी न होण्यासह अनेक पात्र व्यक्ती अद्यापही मतदानाच्या हक्कापासून वंचित आहेत. अशाच व्यक्ती, युवकांना मतदानाचे महत्त्व कळावे आणि त्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून घेत मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने येत्या २५ जानेवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या  मतदान दिनाच्या औचित्यावर जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्यांचा आधार घेण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तालुका आणि ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून फलकांद्वारे लोकांना मतदानाचे महत्त्व पटविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा निवडणूक अधिकारी आपल्या सहकाºयांसह ही मोहिम राबविणार आहेत. याची जय्यत तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय