शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : पोषण पुनर्वसन केंद्रातील आहार वितरण अनियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:35 IST

वाशिम :  कुपोषित बालक तसेच मातेला उपचार व पोषण आहाराची व्यवस्था म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापन केलेल्या पोषण पुनर्वसन केंद्रातील आहार वितरण अनियमित असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित कंत्राटदाराला समज दिल्यानंतर शुक्रवारी पोषण आहार वितरण झाले.

ठळक मुद्दे जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार कंत्राटदाराला दिली समज

संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  कुपोषित बालक तसेच मातेला उपचार व पोषण आहाराची व्यवस्था म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापन केलेल्या पोषण पुनर्वसन केंद्रातील आहार वितरण अनियमित असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित कंत्राटदाराला समज दिल्यानंतर शुक्रवारी पोषण आहार वितरण झाले.माता व बालकांना पोषण आहार तसेच वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) स्थापन करण्यात आले आहे. येथे बालकांना सकाळी दूध, चहा, लाडू, उसळ, फळं, दुपारी भोजन, दर दोन तासांनी पातळ खीर, सायंकाळी दूध व भोजन असा आहार पुरविणे बंधनकारक आहे. हा आहार पुरविताना अनियमितता होत असून, आठवड्यातील काही दिवस आहारच दिला जात नसल्याचा प्रकार समोर येत आहे. गत आठ दिवसांपासून हा आहार बंद असल्याने रुग्णांची प्रचंड प्रमाणात गैरसोय झाली. याची कल्पना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आलेली असतानाही पोषण आहार पुरवठा केला नव्हता. दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी हा प्रकार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत यांच्या कानावर टाकला असता, अमरावती येथील बैठक आटोपल्यानंतर दुसर्‍या दिवशी संबंधित कंत्राटदाराला समज दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. १५ फेब्रुवारीला समज दिल्यानंतर १६ फेब्रुवारीला पोषण आहार पुरविण्यात आला. पोषण आहार पुरविण्यात अनियमितता होणे हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या कक्षात पिण्यासाठी पाण्याची सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.  दरम्यान, पोषण आहार बंद असतानाच्या कालावधीतील पोषण आहाराचे देयक मात्र काढले जात असल्याची माहिती आहे.

पोषण पुनर्वसन केंद्राची जबाबदारी असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार हे मेळघाटात प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. या केंद्रातील पोषण आहारात खंड पडू नये म्हणून पुरवठादाराला समज देण्यात आली. यानंतरही पोषण आहार नियमित राहावा, यासाठी याप्रकरणी मी जातीने लक्ष देईन. - डॉ. अरूण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.

टॅग्स :washimवाशिम