शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:37 IST

पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील नागरिकांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचे तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २३ मार्च रोजी सायंकाळी दिले. जिल्ह्याचा रहिवासी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवेश दिला जाणार नाही तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई केली असून, पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहे.राज्यात नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. तथापि, सावधगिरी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी मोडक यांनी २३ मार्च रोजी सीमा बंदीचा आदेश जारी केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने १०० टक्के बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेशात नमूद आहे. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्ती, प्रवाशांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २३ मार्च २०२० पासून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची, पेट्रोलियम पदार्थ, दुध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे इत्यादींची वाहतूक वगळता जिल्ह्यात येणारी व जिल्ह्यातून जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.सर्व सीमांची नाकाबंदी करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाºया कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले. सदर आदेश धडकताच सायंकाळी स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारातील गर्दी कमी केली.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस