शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील बालविवाह रोखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:37 IST

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मजलापूर येथील एका १५ वर्षीय मुलीचा १२ मार्च रोजी होत असलेला विवाह महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रोखला गेला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह मंगरूळपीरचे सहायक पोलीस निरीक्षक ए. के. कांबळे, ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी दीपाली वाकोडे यांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून, मुलीचा बालविवाह न करण्याचे हमीपत्र घेतले.  

ठळक मुद्देमहिला व बालविकास विभागाची सतर्कताबालविवाह न करण्याचे घेतले हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मजलापूर येथील एका १५ वर्षीय मुलीचा १२ मार्च रोजी होत असलेला विवाह महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रोखला गेला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह मंगरूळपीरचे सहायक पोलीस निरीक्षक ए. के. कांबळे, ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी दीपाली वाकोडे यांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून, मुलीचा बालविवाह न करण्याचे हमीपत्र घेतले.  

सोमवारी सकाळी मजलापूर येथे बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ मजलापूरच्या ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी वाकोडे यांना याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली.   सुभाष राठोड, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी दिलीप राठोड व कर्मचारी यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती देऊन, बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले.    यावेळी राठोड यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना कुठेही बालविवाह घडत असल्यास चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच बालविवाह केल्यास संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. 

टॅग्स :washimवाशिम