शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

वाशिम बाजार समिती निवडणूक : अपिलावर सुनावणी झाली; आता निकालाकडे लक्ष

By संतोष वानखडे | Updated: April 19, 2023 17:51 IST

वाशिम बाजार समितीच्या १२ माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपावर १२ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणी घेतली.

वाशिम - सहा वर्षांसाठी निलंबित झालेल्या वाशिम बाजार समितीच्या १२ माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपावर १२ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणी घेतली. या सुनावणीचा निर्णय १८ एप्रिल रोजी जाहिर झाला असून, अर्जदाराचे अपिल फेटाळण्यात आल्याने १२ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले. हा १२ माजी संचालकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

वाशिम बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी १८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी सात अर्ज बाद ठरल्याने १७६ उमेदवारी अर्ज कायम आहेत. दरम्यान, अर्ज छानणीच्या दिवशी २०१७ ते २०१८ मधील सहा वर्षाच्या निलंबनप्रकरणी माजी १२ संचालकांच्या उमेदवारी अर्जावर उमेदवार प्रांजलकुमार वाळली (जैन) यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, हा आक्षेप फेटाळून लावत १२ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. याविरोधात जैन यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपिल दाखल केले.

अपिलावर १२ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत राखून ठेवलेला निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी १८ एप्रिल रोजी जाहिर केला असून, त्याची प्रत १९ एप्रिल रोजी अपिलार्थी प्रांजलकुमार वाळली यांना देण्यात आली. १६ जानेवारी २०१७ पासून सहा वर्षाचा कालावधी हा १५ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होत असल्याने अपिलार्थींचे अपिल अमान्य करण्यात येत आहे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही योग्य असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे.

टॅग्स :washimवाशिम