शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

वाशिम: खरीप पीकविम्याचा १३२४४ शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 10:56 IST

Washim News १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे.

ठळक मुद्दे१ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा काढणाऱ्या आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या १३ हजार २४३ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. पीकविम्यापोटी या शेतकऱ्यांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई मिळणार असून, त्यापैकी २२९१ शेतकऱ्यांच्या खात्यात ९०.४० लाख रुपयांची रक्कमही जमा झाली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार ८२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांसाठी विमा उतरविला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी ८०९ कोटी रुपयांचा भरणा पीकविमा कंपनीकडे केला होता. यंदाच्या हंगामात विविध स्थानिक नैसर्गिक आपत्तीसह परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात सोयाबीनच्या नुकसानाचे प्रमाण अधिक होते. या नुकसानापोटी शेतकऱ्यांनी पीकविमा मिळण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफ लाईन पद्धतीने रितसर अर्ज केले. या अर्जानुसार पीकविमा कंपनीने सर्वेक्षण केले असता प्रत्यक्ष स्थानिक आपत्तीने ५ हजार ६६१ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे  नुकसानापोटी या शेतकऱ्यांना ९३.४४ लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे, तर काढणी पश्चात परतीच्या पावसामुळे  ७ हजार ५८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले असून, या शेतकºयांना नुकसानपोटी ५ कोटी ९१  लाख८९ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. अर्थात दोन्ही प्रकारातील नुकसानापोटी एकूण १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५.३३ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून, एकूण २२९१ शेतकºयांच्या खात्यात ९० लाख ४९ हजार रुपयांची रक्कमही जमा करण्यात आली आहे.  पीकविम्याचा लाभ मिळालेले शेतकरी प्रकार                     शेतकरी संख्या     रक्कमस्थानिक आपत्ती         ५६६१             ९३.४४ काढणी पश्चात           ७५८३            ५९१.८९ ------------------------------------- एकूण                    १३२४४              ६८५.३३ 

 ५ हजार शेतकरी वचिंत जिल्ह्यात स्थानिक आपत्ती आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी १८ हजारांहून अधिक शेतकºयांनी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीकडे आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने तक्रारी केल्या. तथापि, यात निकषात  न बसल्याने आणि तक्रारीस विलंब झाल्याने ५ हजारांहून अधिक शेतकºयांना पीकविम्याचा लाभ मिळू शकला नाही.   खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी १३ हजार २४४ शेतकºयांना ६८५ कोटी ३३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी २ हजार २९१ शेतकºयांच्या खात्यात पीकविम्याची रक्कमही मंजूर झाली आहे. -शंकरराव तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा