शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ११ कलमी कार्यक्रम अंमलबजावणीचे निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:03 IST

वाशिम: ग्रामीण विकासाला चालना देणार्‍या ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश रोहयो कक्षाच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी ३0 डिसेंबरला तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांना दिले.

ठळक मुद्देमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना तीन महिन्यांत नियोजन करण्याची कसरतप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ग्रामीण विकासाला चालना देणार्‍या ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश रोहयो कक्षाच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी ३0 डिसेंबरला तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांना दिले. दरम्यान, आर्थिक वर्ष संपण्याला आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, या कालावधीत नियोजन करणे आणि कामे पूर्ण करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. ‘११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणीच नाही’, या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २८ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे आणि गाव समृद्ध व्हावे, यासाठी शासनातर्फे ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध अकरा कामे मोहीम स्वरूपात घेऊन राबविणे आवश्यक आहे. वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ कामे प्राधान्याने राबविण्यात येणार आहेत. त्यात सिंचन विहिरी, शेततळे, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, ग्रामभवन, गावांतर्गत रस्ते, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, समृद्ध गाव तलाव व इतर जलसंधारणाची कामे, वृक्ष लागवड व संगोपन आणि ग्राम सबलीकरणाच्या समृद्ध ग्राम योजनांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात सन २0१४ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे अपूर्ण आहेत. यामध्ये नाला सरळीकरण, पाणंद रस्ते, सिंचन विहिरींसह इतर विकासात्मक कामांचा समावेश आहे. तसेच राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा ११ कलमी कार्यक्रमाचीदेखील जिल्ह्यात अमंलबजावणी नसल्याने विकास कामांना खीळ बसत आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच रोजगार हमी योजना समितीचे सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन काळे यांनी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी अकोला येथे चर्चा केली होती. सदर कामांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात ना. डॉ. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देशही दिले होते. ‘लोकमत’नेदेखील २८ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर ३0 डिसेंबर रोजी रोजगार हमी योजना कक्षाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी आदेश जारी करीत ११ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी व तहसीलदारांना दिले. सर्व पंचायत समिती स्तरावर मजुरांच्या मागणीनुसार ही कामे लवकरात लवकर उपलब्ध करता यावी, तसेच समृद्ध जनकल्याण योजनेची कामे शासनाच्या निकषानुसार घेण्यात यावी, अशा सूचनाही तालुका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पदाधिकार्‍यांची दिशाभूल न करण्याची ताकीदशासनाच्या निर्देशानुसार पंचायत समिती स्तरावरील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करावी. तसेच मजुरांची आणखी मागणी असल्यास समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत कामे सुरु करण्यात यावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी कोरडे यांनी केल्या. उपरोक्त कामे जिल्हा स्तरावरून आदेश आल्याशिवाय सुरू करण्यात येऊ नये, अशा कोणत्याही सूचना तालुका स्तरावर दिलेल्या नव्हत्या. तालुका स्तरावरील प्रशासनाने पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांची दिशाभूल करू नये, अशी ताकीदही रोजगार हमी योजनेच्या जिल्हा कक्षाने दिली.

तालुकास्तरीय प्रशासनाची नियोजनाची कसरत!आर्थिक वर्ष संपण्याला तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. तीन महिन्यांत कामांचे नियोजन करणे आणि कामे पूर्ण कशी होतील, या दृष्टीने नियोजन करणे ही तालुकास्तरीय प्रशासनाची कसरत ठरणार आहे. 

टॅग्स :washimवाशिम