शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या चौकशीसाठी उपसरपंचांसह तिघांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:11 IST

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार उपसरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार उपसरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावे,अन्यथा येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी रस्त्यावरच आत्मदहन करू, असा इशारा मालेगावचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व ठाणेदारांना निवेदनाद्वारे त्यांनी १७ जानेवारी रोजी दिला आहे.  ग्रामपंचायत रिधोरा गोकसावंगी येथे १४ व्या वित्त आयोगातून दोन सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे काम सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आले. सदर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने त्यावेळीच उपसरपंच मंदा महादेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विलास इंगोले आणि अविनाश वानखडे यांनी गटविकास अधिकाºयांना निवेदन सादर केले आणि या प्रकाराकडे लक्ष वेधले; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. उलट या रस्त्याचा दर्जा चांगला असल्याचे संबंधित अधिकाºयांनी दर्शवित कामाचे देयक काढण्यास सहकार्य केले. विशेष म्हणजे काम सुरु असताना संबंधित अभियंत्यांनी त्याची एकदाही पाहणी केली नाही. आता तीन महिन्यांच्या कालावधीतच हा रस्ता उखडून खडी व वाळू निघत आहे. त्यामुळे या कामातून शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचे सिद्ध होत असल्याने या कामाची चौकशी करावी आणि संबंधित दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे, अशी मागणी उपसरपंच मंदा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विलास इंगोले आणि अविनाश वानखडे यांनी केली आहे. याची दखल न घेतल्यास येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी याच निकृष्ट रस्त्यावर आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :washimवाशिम