शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला प्रतीक्षा लोकापर्णाची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:01 IST

मालेगाव: तालुक्याच्या अद्ययावत प्रथमश्रेणी दुय्यम निबंधक कार्यालयासाठी १ कोटी रुपये खर्चून शिरपूर येथील आसेगाव मार्गावर दीड वर्षापूर्वी भव्य इमारत उभारण्यात आली; परंतु सर्व काम झाल्यानंतरही या ईमारतीच्या लोकापर्णाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाने या ईमारतीचे हस्तांतरणही संबंधित प्रशासनाला केले आहे. इमारतीचे लोकापर्ण झाले नाही, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार अद्यापही जुन्याच ईमारतीत सुरू आहे.

 मालेगाव: तालुक्याच्या अद्ययावत प्रथमश्रेणी दुय्यम निबंधक कार्यालयासाठी १ कोटी रुपये खर्चून शिरपूर येथील आसेगाव मार्गावर दीड वर्षापूर्वी भव्य इमारत उभारण्यात आली; परंतु सर्व काम झाल्यानंतरही या ईमारतीच्या लोकापर्णाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही. त्यामुळे अद्यापही शिरपूर येथील जुन्याच इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. मालेगाव तालुक्याचे दुय्यम निबंधक प्रथम श्रेणी कार्यालय शिरपूर येथे आहे. या कार्यालयाची जुनी इमारत ही खूप जुनी आणि अपुरी असून, परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. दुय्यम निबंधकांचे कामकाज सुरळीत व्हावे, त्यासाठी प्रशस्त आणि सुसज्ज जागा असावी म्हणून शिरपूर येथील आसेगाव मार्गावर या कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी जागा राखीव करण्यात आली. या इमारतीच्या कामासाठी निधी मंजूर झाल्यानंतर रडतखडत हे काम दीड वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. तथापि, इमारतीच्या आवाराला असलेल्या कुं पणांच्या दोन भिंतीचे काम निधीअभावी रखडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तो अडथळा दूर करताना तार कूंपण लावले आता या कुंपणाला प्रवेशद्वार लावणे बाकी असून, तेसुद्धा तयार झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ईमारतीचे हस्तांतरणही संबंधित प्रशासनाला केले आहे. तथापि, अद्यापही या इमारतीचे लोकापर्ण झाले नाही. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार अद्यापही जुन्याच ईमारतीत सुरू आहे. येथे पसरलेले घाणीचे साम्राज्य आणि जागेचा अभाव यामुळे येथे येणाºया तालुकाभरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी लवकरात लवकर नव्या प्रशासकीय ईमारतीचे लोकापर्ण करावे, अशी मागणी जनतेच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवShirpur Jainशिरपूर जैन