शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बियाण्यांसाठी महाबीजकडे वेटिंग; विक्रेते, शेतकऱ्यांची धावाधाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 12:08 IST

Mahabeej News : बियाणे एक हजाराने स्वस्त असल्याने या बियाण्यांकडे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचाही कल वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. दरम्यान,  इतर कंपन्यांच्या तुलनेत महाबीजचे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) सोयाबीन बियाणे एक हजाराने स्वस्त असल्याने या बियाण्यांकडे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचाही कल वाढला आहे. त्यामुळे बुकिंग फुल्ल होत असून, बियाणांसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.विविध संकटांतून स्वत:ला सावरत शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागला आहे. कृषी विभागानेदेखील खरीप पेरणीचे नियोजन केले असून, ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यंदा तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला असून, त्यादृष्टीने बियाणांचे नियोजन करण्यात येत आहे. दुसरीकडे खताप्रमाणेच विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांच्या प्रति बॅगचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. त्या तुलनेत महाबीजची ३० किलो सोयाबीन बियाणे बॅगची किंमतही कमी असल्याने आणि विश्वासार्ह बियाणे असल्याने महाबीजच्या बियाण्याला शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचीदेखील प्रथमपसंती मिळत आहे. इतर कंपनीच्या ३० किलो सोयाबीन बियाणे बॅगची किंमत ३३५० रुपयांच्या आसपास, तर महाबीजच्या बॅगची किंमत २२५० रुपये असल्याने महाबीजच्या बियाणांसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ शेतकऱ्यांसह विक्रेत्यांवर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात १६ हजार ६७० क्विंटल सोयाबीन बियाणे वितरणाचे नियोजन असून, आतापर्यंत १२ हजार ८७६ क्विंटल बियाणांचे बुकिंगही पूर्णत्वाकडे आले. उर्वरित ३७९४ क्विंटल बियाणे लवकरच प्राप्त होण्याची आशा असून, ते बियाणेदेखील मार्केटमध्ये वितरण करावयाचे आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे अनुदानावर देण्यात येणार असून, यासाठी ३२०० क्विंटल लक्ष्यांक निश्चित करण्यात आला. कृषी विभागाकडून यासंदर्भातील पत्रही महाबीजच्या वाशिम जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाले आहे. महाबीजचे बियाणे मिळावे, यासाठी विक्रेत्यांसह शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे बियाणे टंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत.

विक्रेत्यांकडून पाच महिन्यांपूर्वीच बुकिंग !पाच महिन्यांपूर्वीच विक्रेत्यांनी महाबीजकडे सोयाबीन बियाणासंदर्भात बुकिंग केले होते. ज्या विक्रेत्यांनी १०० बॅगसाठी अ‍ॅडव्हान्स पेमेंट दिले, त्यांना आता केवळ १८ ते २० बॅग मिळत आहेत. महाबीजच्या सोयाबीन बॅगची एमआरपी आणि इतर कंपन्यांच्या एमआरपीमध्ये ११०० रुपयांची तफावत असल्याने बाजारपेठेत साहजिकच महाबीजच्या बियाणांची मागणी वाढली आहे. बुकिंग घ्यायलाही महाबीजकडे बियाणे उपलब्ध नाही, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणांची टंचाई भासू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. इतर कंपनीच्या तुलनेत महाबीजच्या सोयाबीन बॅगची किंमत कमी आणि विश्वासार्हता असल्याने मागणी प्रचंड वाढली आहे. कृषी विभागाकडूनदेखील शेतकऱ्यांना परमिटवर द्यावयाच्या बियाणांसाठी ३२०० क्विंटलची मागणी प्राप्त झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात मार्केटमध्ये १६६७० क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन आहे.- डॉ. प्रशांत घावडे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम

टॅग्स :MahabeejमहाबीजagricultureशेतीFarmerशेतकरी