शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

बियाणांसाठी महाबीजकडे वेटिंग; शेतकऱ्यांची धावाधाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:44 IST

विविध कंपन्यांच्या बियाणे किमतीत वाढ : कृषी विभागाकडून ३२०० क्विंटलचा लक्ष्यांक संतोष वानखडे वाशिम : खरीप हंगाम जवळ येत ...

विविध कंपन्यांच्या बियाणे किमतीत वाढ : कृषी विभागाकडून ३२०० क्विंटलचा लक्ष्यांक

संतोष वानखडे

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. दरम्यान, इतर कंपन्यांच्या तुलनेत महाबीजचे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) सोयाबीन बियाणे एक हजाराने स्वस्त असल्याने या बियाणांकडे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचाही कल वाढला आहे. त्यामुळे बुकिंग फुल्ल होत असून, बियाणांसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.

विविध संकटांतून स्वत:ला सावरत शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागला आहे. कृषी विभागानेदेखील खरीप पेरणीचे नियोजन केले असून, ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यंदा तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला असून, त्यादृष्टीने बियाणांचे नियोजन करण्यात येत आहे. दुसरीकडे खताप्रमाणेच विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांच्या प्रति बॅगचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. त्या तुलनेत महाबीजची ३० किलो सोयाबीन बियाणे बॅगची किंमतही कमी असल्याने आणि विश्वासार्ह बियाणे असल्याने महाबीजच्या बियाणाला शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचीदेखील प्रथमपसंती मिळत आहे. इतर कंपनीच्या ३० किलो सोयाबीन बियाणे बॅगची किंमत ३३५० रुपयांच्या आसपास, तर महाबीजच्या बॅगची किंमत २२५० रुपये असल्याने महाबीजच्या बियाणांसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ शेतकऱ्यांसह विक्रेत्यांवर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात १६ हजार ६७० क्विंटल सोयाबीन बियाणे वितरणाचे नियोजन असून, आतापर्यंत १२ हजार ८७६ क्विंटल बियाणांचे बुकिंगही पूर्णत्वाकडे आले. उर्वरित ३७९४ क्विंटल बियाणे लवकरच प्राप्त होण्याची आशा असून, ते बियाणेदेखील मार्केटमध्ये वितरण करावयाचे आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे अनुदानावर देण्यात येणार असून, यासाठी ३२०० क्विंटल लक्ष्यांक निश्चित करण्यात आला. कृषी विभागाकडून यासंदर्भातील पत्रही महाबीजच्या वाशिम जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाले आहे. महाबीजचे बियाणे मिळावे, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

०००००००००००००

३२०० क्विंटल बियाणांसंदर्भात कृषी विभागाचा पत्रव्यवहार !

कृषी विभागातर्फे सोयाबीनचे अनुदानित बियाणे पात्र शेतकऱ्यांना वितरित करावयाचे आहे. यासाठी कृषी विभागाने महाबीजकडे पत्रव्यवहार केला असून, ३२०० क्विंटल बियाणे राखीव ठेवण्याची मागणी नोंदविली आहे. अनुदानित बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून अर्जही मागविण्यात आले. कृषी विभागाच्या मागणीनुसार ३२०० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

.....................

विक्रेत्यांकडून पाच महिन्यांपूर्वीच बुकिंग !

पाच महिन्यांपूर्वीच विक्रेत्यांनी महाबीजकडे सोयाबीन बियाणासंदर्भात बुकिंग केले होते. ज्या विक्रेत्यांनी १०० बॅगसाठी अ‍ॅडव्हान्स पेमेंट दिले, त्यांना आता केवळ १८ ते २० बॅग मिळत आहेत. महाबीजच्या सोयाबीन बॅगची एमआरपी आणि इतर कंपन्यांच्या एमआरपीमध्ये ११०० रुपयांची तफावत असल्याने बाजारपेठेत साहजिकच महाबीजच्या बियाणांची मागणी वाढली आहे. बुकिंग घ्यायलाही महाबीजकडे बियाणे उपलब्ध नाही, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.

०००००००

महाबीजचे बियाणे प्रति बॅग किंमत - २२५०

इतर कंपनीचे बियाणे प्रति बॅग किंमत - ३३५०

०००००

कृषी विभागासाठी राखीव बियाणे - ३२०० क्विंटल

मार्केटमध्ये वितरित करावयाचे बियाणे - १६६७० क्विंटल

०००००००००००००

कोट बॉक्स

खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणांची टंचाई भासू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. इतर कंपनीच्या तुलनेत महाबीजच्या सोयाबीन बॅगची किंमत कमी आणि विश्वासार्हता असल्याने मागणी प्रचंड वाढली आहे. कृषी विभागाकडूनदेखील शेतकऱ्यांना परमिटवर द्यावयाच्या बियाणांसाठी ३२०० क्विंटलची मागणी प्राप्त झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात मार्केटमध्ये १६६७० क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन आहे.

- डॉ. प्रशांत घावडे

जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, वाशिम

००