शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

नुकसानभरपाईची प्रतीक्षाच!

By admin | Updated: March 28, 2016 02:26 IST

५.६२ कोटी अप्राप्त; डिसेंबर २0१४ व जानेवारी २0१५ मधील गारपीट.

संतोष वानखडे / वाशिमआधीच दुष्काळात होरपळणार्‍या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना, नुकसानभरपाईची ५.६२ कोटींची रक्कम एका वर्षानंतरही मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. ३१ डिसेंबर २0१४ ते १ जानेवारी २0१५ या दरम्यान आलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील रब्बी पिके व फळबागेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले होते.गत तीन वर्षांपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी विविध संकटांमधून मार्गक्रमण करीत परिस्थितीला सामोरे जात आहेत. डिसेंबर २0१४ ते जानेवारी २0१५ या दरम्यान अवकाळी पावसाने वाशिम जिल्हय़ातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले होते. गहू ५४३ हेक्टर, हरभरा ४९३ हेक्टर, तूर २९0७ हेक्टर, फळ पिके १९९ हेक्टर व इतर पिके ९९ हेक्टर असा नुकसानाचा अहवाल एका वर्षापूर्वी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. या नुकसानापोटी ५.६२ कोटी रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे नोंदविलेली आहे. अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याने शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले. लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधून घेणे अपेक्षित आहे; परंतु तसा प्रयत्न गांभीर्याने होत नसल्याने जिल्हय़ातील शेतकरी दुष्काळाच्या दाहकतेत भाजून निघत आहेत.डिसेंबर २0१४ व जानेवारी २0१५ च्या अवकाळी व गारपिटीने जिल्हय़ातील ४९३.५१ हेक्टरवरील हरभरा पिकाचे नुकसान केले होते. हेक्टरी १५ हजार रुपयांप्रमाणे ७४ लाख दोन हजार ६५0 रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम जिल्हय़ाला मिळणे अपेक्षित आहे. तसा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे शासनाकडे सादर केला; मात्र अद्याप या प्रस्तावाला हिरवी झेंडी नसल्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मालेगाव तालुक्यातील ३५३.३१ व कारंजा तालुक्यातील १४0.२0 हेक्टर हरभर्‍याचे नुकसान झाले होते. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्हय़ातील १९९.२८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान केले होते. यामध्ये मालेगाव तालुक्यातील १३७.६७ हेक्टर, मंगरुळपीर २५.६९ हेक्टर व कारंजा तालुक्यातील ३६ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे. हेक्टरी २५ हजार रुपये याप्रमाणे ४९ लाख ८२ हजार रुपयाची अनुदान मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे. शासन स्तरावर अद्याप या मागणीची दखल घेण्यात न आल्याने फळ उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. ९९.७८ हेक्टवरील इतर पिकांसाठी १४.९६ लाख रुपयांच्या भरपाईची प्रतीक्षा आहे.