शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेसाठी वेटिंग; दररोज १०० वर कॉल्स !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:38 IST

वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला घर ते कोविड केअर ...

वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला घर ते कोविड केअर सेंटरपर्यंत घेऊन जाण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा मोठा आधार आहे; परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने दररोज १०० वर कॉल्स येत असून, रुग्णवाहिकेसाठीही वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रुग्णवाहिकेची मोफत सुविधा उपलब्ध आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या फेऱ्याही प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत ११ पैकी तीन रुग्णवाहिकेतून कोरोनाचे रुग्ण नेले जात होते; परंतु मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने आता सर्वच रुग्णवाहिकेतून कोरोनाचे रुग्ण नेण्यात येत आहेत. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला की, उपलब्धतेनुसार रुग्णवाहिका दारापर्यंत येते. रुग्णसंख्या वाढत असल्याने दैनंदिन १०० च्या पेक्षा अधिक कॉल येत आहेत. त्यामुळे अनेकांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातून जिल्हास्तरावर येण्यासाठी किमान अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. तेवढाच वेळ परत जाण्यासाठी लागत असल्याने कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका तातडीने मिळेल, याची शाश्वती नाही. कधी-कधी दोन, दोन तास रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नाही.

००००

कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूक

महिनाइतर रुग्ण कोरोना

जानेवारी १०९६ २७१

फेबुवारी १३५५ २५९

मार्च १४१ २०१६

००००

एकूण रुग्णवाहिका ११

००

दररोज येणारे कॉल्स

शहरातून येणारे कॉल ३५ टक्के

ग्रामीण भागातून येणारे कॉल ६५ टक्के

००००

कॉल केल्यानंतर एका, एका तासाने रुग्णवाहिका हजर

रुग्णसंख्या वाढत असल्याने १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णांना सतत कोविड केअर सेंटर किंवा दवाखान्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. जोपर्यंत पहिल्या रुग्णाला कोविड केअर सेंटरपर्यंत पोहोचवून दिले जात नाही, तोपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही.

कधी कधी तर कॉल केल्यानंतर दोन तासातही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. रुग्णवाहिका जागेवर असेल तर कॉल केल्यानंतर अर्ध्या तासात उपलब्ध होऊ शकते.

रुग्ण वाढत असल्याने आणि रुग्णवाहिकांची संख्या अपुरी पडत असल्याने वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास शहरी भागातील अनेकजण खासगी रुग्णवाहिकेची सेवा घेतात.

०००००

१०८ रुग्णवाहिकेची मागणी

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि त्या तुलनेत पूर्वीच्याच ११ रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने साहजिकच रुग्णवाहिकेसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी १०८ रुग्णवाहिका आणखी उपलब्ध कराव्यात, अशी मागणी समोर येत आहे.