वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोंबर हा दिवस मतदार दिवस म्हणून पाळला जावा. यादिवशी सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप केले जावे तसेच मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राविषयी सविस्तर माहिती देण्यात यावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक सेंथींल राजन यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. के. इंगळे, रिसोडचे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक अमानकर, कारंजाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनकर काळे, वाशिमचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पारनाईक यांच्यासह स्वीप समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक सेंथींल राजन म्हणाले की, १२ ऑक्टोंबर रोजी मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने आतापयर्ंत खूप चांगले काम केले आहे. मात्र येथून पुढेही या कामात सातत्य राहणे आवश्यक आहे. निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी स्वीप समितीने आता अधिक प्रभावी व सक्रियपणे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. त्यासाठी विविध माध्यमातून त्यांना मतदानाचे महत्व व मतदानाचा दिवस याविषयी आठवण करून द्यावी असे त्यांनी सांगितले. सदर बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी स्वीप कार्यक्रमाचा आढावा घेताना सर्व निवडणूक निर्णय अधिकार्यांनी मतदार चिठ्ठीचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर द्यावा. तसेच त्यावेळी संबंधित मतदाराला मतदान करण्याचे आवाहनही करण्याची सूचना त्यांनी कर्मचार्यांना केली.
१२ ऑक्टोंबर मतदार दिवस म्हणून पाळला जावा
By admin | Updated: October 10, 2014 00:44 IST