शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

नियमांचे उल्लंघन; बियाणे विक्री परवाना रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 12:08 IST

Seed sales license revoked : बियाणे विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बियाण्याची जादा दराने विक्री करणे, तपासणीवेळी दस्तऐवज उपलब्ध करून न दिल्याप्रकरणी मालेगाव येथील वसंत कृषी सेवा केंद्राचा बियाणे विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी ४ जून रोजी दिला.खते, बियाण्यांची विक्री ही शासकीय दरानेच तसेच पॉस मशीनद्वारेच करण्यात यावे, असे निर्देश कृषी विभागाने वारंवार कृषी सेवा केंद्र संचालकांना दिलेले आहेत. खते, बियाण्यांची जादा दराने विक्री तर होत नाही ना? याची पडताळणी म्हणून कृषी विभागाची भरारी पथके तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या चमूतर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात आहे. मालेगाव येथील वसंत कृषी सेवा केंद्रातून एका शेतकऱ्याला जादा दराने महाबीजच्या बियाण्याची विक्री झाल्याचे समोर आले. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, संबंधित कृषी सेवा केंद्राने जादा दराने बियाणे विक्री झाल्याचे तसेच तपासणीदरम्यान आवश्यक ते दस्तऐवज उपलब्ध करून दिले नसल्याचे सिद्ध झाले. याबाबत तालुकास्तरावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वसंत कृषी सेवा केंद्राचा बियाणे विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी दिला. 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र