लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मुंगळा येथीलअत्यल्पभूधारक शेतकरी राजू भगवान क्षीरसागर या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावरच पडले. अशात माणुसकीची जाण ठेवून या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी गावकरी आणि तरूण धावून आले. त्यांनी अवघ्या एका दिवसात ८३०० रुपयांची रक्कम जमा करून राजू क्षीरसागर यांच्या कुटूबाला देत मोठा आधार दिला आणि पुढेही ही मदत क्षीरसागर यांची चिमुकली मुले सक्षम होईपर्यंत चालू ठेवण्याचा निर्धारही केला. राजू क्षीरसागर यांच्याकडे अवघी दीड ते दोन एकर शेती असून, यंदा अत्यल्प पावसामुळे सोयाबिन पिकाने दगा दिला. त्यांना तीन क्विंटल सोयाबीन झाले. दोन दिवसापूर्वीच त्यांनी सोयाबीन विकून लोकांची उधारी दिली. मात्र, कुटुंबाचा उदरनिर्वाह व इतर कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते राहत होते. याच चिंतेमुळे त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू क्षीरसागर यांची घरची परिस्थीती अत्यंत हालाखीची असून,त्यांच्या मागे आई, वडील पत्नी व चार मुली असा परिवार आहे. सर्वात मोठी मुलगी ही ५ व्या वर्गात शिक्षण घेते. वडिलांचे छत्र हरविल्यामुळे चार मुली पोरक्या झाल्या. ही बाब गावातील काही तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी गावातील मुंगळा-माझं गाव एक परिवार या संघटनेमधील सर्व सदस्यांना नम्र आवाहन केले आणि राजू क्षीरसागर यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करण्याचे ठरवले. त्यातून एक दिवसात ८३०० रुपये जमा झाले ते त्यानी राजू क्षीरसागर यांच्या घरी पत्नी आई आणि मुलिना दिले. यासाठी प्रविण वायकर, गजानन सोनुने, रमेश महाळंकर, नंदकिशोर वनस्कर, गणेश प्रल्हाद राऊत, शिवाजी आढाव, राजिव राऊत, रामभाऊ घुगे, विनोद राऊत, राहुल दळवे, मनोज बेलोकर, रवि वनस्कर, अंकुश राऊत, डॉ शाम बिडवई, मंगेश देशमुख, ओम राऊत, पियुष दळवी, अनंतराव कुटे, विकास जायभाये, सिद्धेश्वर केळे, सतिश मुळे, भरत राऊत, डॉ राजेश सोनी, संजय धाबे, विनोद नरोटे, उमेश नखाते, पांडुरंग राऊत, गणेश राजेकर, राहुल राऊत, नितिन केळे, गौरव काकडे, गजानन केळे, ओंकार राऊत यांचा सहभाग आहे.
मुंगळा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियाच्या मदतीला धावले गावकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:24 IST
नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मुंगळा येथीलअत्यल्पभूधारक शेतकरी राजू भगवान क्षीरसागर या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावरच पडले. अशात माणुसकीची जाण ठेवून या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी गावकरी आणि तरूण धावून आले.
मुंगळा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियाच्या मदतीला धावले गावकरी
ठळक मुद्देमाणुसकीचा प्रत्ययमालेगाव तालुक्यातील मुंगळावासियांचा पुढाकार