कृषी विज्ञान केंद्राकडून दर तीन वर्षांनी समूह पध्दतीने पाच ते सहा गावांची दत्तक गाव म्हणून निवड करुन त्या गावाकडे विशेष लक्ष पुरविले जाते. या अंतर्गत २०२१ पासून पुढील तीन वर्षांकरिता जिल्ह्यातील एकूण सात गावांची निवड करण्यात आली आहे. या दत्तक गावांत विकास आराखड्याबाबत शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यात १० फेब्रुवारी रोजी दस्तापूर (अंबापूर) येथील ग्रामपंचायत सभागृहात गावाचा आराखडा तयार करण्याच्या हेतूने विशेष सुक्ष्म नियोजन व जनजागृती सभा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच अनिताबाई आटपडकर, तर उद्घाटक म्हणून, उपसरपंच विश्वनाथ बाबुराव आटपडकर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुकेश गुंजे, ग्रामसेवक व्ही. पी. वानखडे, कृषी सहायक अंकुश कव्हर मंचावर विराजमान होते. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ तसेच गावचे प्रभारी अधिकारी टी. एस. देशमुख यांनी शेती विकासाच्या नियोजनासाठी गाव सर्वेक्षणाचे महत्व व कृषी विज्ञान केंद्राची भूमिका व उपलब्ध सेवा सुविधा उपस्थितांसमोर स्पष्टपणे मांडल्या. त्यानंतर कार्यक्रमात सहभागी शेतकरी, महिला भगिनी तसेच ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांनी गावाची सर्वसाधारण माहिती. यावेळी शेती पध्दतीत बदल करण्याच्या मूळ उद्देशाने कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ एस. के. देशमुख, आर. एस. डवरे, एन. बी. पाटीला व शुभांगी वाटाणे यांनी गावासाठी उपयुक्त कृती आराखडा मांडून गावकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
===Photopath===
120221\12wsm_1_12022021_35.jpg
===Caption===
ग्रामविकास आराखड्यासाठी गाव भेट, जनजागृती सभा